अभिनेत्री सायली संजीवच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मात्र ही लगीनघाई सायलीची नसून ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतील शर्वरीची आहे.
शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता अखेर मालिकेत शंतनू – शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. कारण, शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे.
अनुपमा, शर्वरी, शंतनू सगळेच खुश आहेत. घरच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे.
पण, माधुरी मात्र तितकीशी आनंदी दिसत नाहीये. कारण, शंतनू शर्वरीसाठी योग्य नाही असे तिचे ठाम मत आहे.
जगदीशने माधुरीला ताकीद दिली आहे. सगळं काही सुरळीत सुरू असताना आता मिठाचा खडा टाकलास तर मी तुला घटस्फोट देणार, अशा इशाराच त्याने दिला आहे.
शर्वरीच्या हातावर शंतनूच्या प्रेमाचा रंग चढणार आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना १७ जून रोजी आज रात्री १०.०० वाजता शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये पाहायला मिळेल
या मालिकेत सायली साकारत असलेल्या शर्वरीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here