नागपूर : उन्हाळा संपून पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. यामुळे कुठेतरी फिरायला जाण्याची, नवीन काही तरी खाण्याची इच्छा होते. तसेही पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो. कारण, या दिवसांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. मात्र, या दिवसांमध्ये चांगला आहार घेणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात पचनक्रिया मंद होत असते. तसेच दूषित पाणी व अन्नामुळे विविध आजार होतात. यासाठी पावसाळ्यात योग्य आहार घेणे फार गरजेचे होऊन जाते. (What-fruit-to-eat-on-rainy-days?)

फळ हे प्रत्येकाला खायला आवडते. डॉक्टरही जेवणानंतर फळ खाण्याचा सल्ला देत असतात. फळ खाल्याने आरोग्य चांगले राहते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही विशेष फळ बाजारात येत असतात. ही फळे फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित असतात. म्हणून यांचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे. पावसाळ्यात खाण्यावर विशेष लक्ष दिले तर कोणतेही गंभीर आजार होणार नाही.

आलूबुखारा

आलूबुखारा हे आंबट व गोड चव देणारे फळ आहे. पावसाळ्यात अनेकांना पोटाशी संबंधित आजार होत असतात. सतत बाहेरचे खाल्याने ही समस्या उद्भवत असते. आलूबुखारा खाल्ल्याने इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. रोज आलूबुखारा खाल्ल्याने इम्यून सिस्टम मजबूत होते. यातील अँटी ऑक्सीडेंटमुळे आजारांचा धोका कमी होतो.

डाळिंब

डाळिंब हे फळ बाजारात बाराही महिने उपलब्ध असते. डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, पावसाळ्यात या फळाचे महत्त्व अधिक वाढत असते. आजारापासून बचाव करण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे. फायबर आणि व्हिटामिनने युक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन तसे वर्षभर करता येते. मात्र, पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होत असते.

लिची

लिची हे फळ पावसाळ्या दिवसांमध्ये आवर्जून खायला हवे. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्सचा पुरेपूर साठा असते. हे फळ तुमची त्वचा सुधारण्यासोबतच रक्त वाढण्यासाठी मदत करते.

जांभूळ

जांभूळ हे पावसाळ्याच्या दिवसांमध्येच खायला मिळत असते. अन्य दिवसांमध्ये ते मिळत नाही. जांभूळ खाणे शरीरासाठी खूपच फायद्याचे समजले जाते. जांभळात आयर्न, पोटॅशिअम, फोलेट आणि व्हिटामिनची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याचे सेवन केल्याने पोटदुखी आणि इंफेक्शनपासून बचाव करता येतो. हे फळ डायबिटीज आणि कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

नासपती

फायबरयुक्त असलेले नासपती हे फळ खूपच गोड आणि मधुर असे फळ आहे. याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. यात अँटी ऑक्सीडेंट्स मात्रा जास्त असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो. नासपतीने कर्करोग, हायपरटेंशन, डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

चेरी

चेरी या फळाचे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सेवन करणे चांगले समजले जाते. व्हिटॅमिन ए, बी, सी, बीटा कैरोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि पोटॅशिअम युक्त असे हे फळ आहे. यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. व्हिटामिन सी चे प्रमाण चेरीमध्ये अधिक असल्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने इंफेक्शनपासून बचाव होतो.

पीच

पीच हे फळ महाग आहे. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी पीच हे भरलेले असते. या फळाची चव निम गोड असते. या फळांचे अनेक फायदे आहेत. हृदयविकार नियंत्रणात ठेवणे, पचनशक्ती वाढवणे, ॲलर्जी कमी करणे आणि त्वचा सुधरवण्याचे काम पीच करते. पावसाळाच्या दिवसांमध्ये याची मागणी चांगलीच वाढत असते.

(What-fruit-to-eat-on-rainy-days?)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here