नवी दिल्ली : सत्या नडेला यांनी मायक्रॉसॉफ्ट कंपनीचं चेअरमॅन बनवण्यात आलं आहे. भारतीय-अमेरिकन वंशाचे सत्या नडेला यांचा जन्म 19 ऑगस्ट 1967 रोजी हैद्राबादमध्ये झाला होता. बेगमपेटमधील हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो युनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं. 25 वर्षे वयामध्येच त्यांनी मायक्रॉसॉफ्टमध्ये सर्व्हार ग्रुपचं काम करण्यास सुरुवात केली.

Also Read: CBSE बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार: फॉर्म्युला SC मध्ये सादर
22 वर्षांपर्यंत मायक्रॉसॉफ्टमध्ये काम केलं
नडेला 1992 मध्ये मायक्रॉसॉफ्टशी जोडले गेले. या 22 वर्षांमध्ये त्यांनी विंडो सर्व्हर, डेवलपर्स टूलसारख्या अनेक प्रोडक्ट्ससाठी नेतृत्व केलं. मात्र, त्यांना खरी ओळक क्लाऊड कंम्प्यूटींगमधून मिळाली.
क्लाउड गुरु सत्या नडेला
मीडिया रिपोर्ट्सनुसार क्लाउड कम्पुटींगच्या डेव्हलपमेंटचा सल्ला देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमध्ये सत्या नडेला हे एक होते. त्यांच्या या सल्ल्यानंतरच मायक्रॉसॉफ्टने यावर काम करणं सुरु केलं होतं. त्यानंतर लागलीच त्यांना सर्व्हर आणि टूल्स डिव्हीजनचा अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यानंतर त्यांना ऑनलाईन सर्व्हिसेस डिव्हीजनचा वरिष्ठ उपाध्यक्ष, मायक्रॉसॉफ्ट बिझनेस डिव्हीजनचा उपाध्यक्ष, बिझनेस सोल्यूशन्स अँड सर्च एँड एडव्हर्टायझिंग उपाध्यक्ष आणि त्यानंतर क्लाउड अँड एंटरप्राईज विभागाचा कार्यकारी उपाध्यक्ष बनवलं गेलं.

Also Read: एक रुपयांत वाढवा मास्कची विषाणूरोधी क्षमता
मायक्रॉसॉफ्टचं म्हणणं आहे की, त्यांच्या सर्वांत यशस्वी प्रोडक्ट्सपैकी ऑफिस 365 आहे. ‘अजूर’ (मायक्रॉसॉफ्टची स्वत:ची क्लाउड सेवा) ची स्थापना करण्यात देखील नडेला यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. त्यामुळेच त्यांना क्लाउड गुरु नावाने देखील ओळखलं जातं.
बिल गेट्सच्या पदावर सत्या नडेला
यानंतर 2014 मध्ये सत्या नडेला यांना मायक्रॉसॉफ्टच्या 38 वर्षांच्या इतिहासात तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ बनले. त्यांच्या आधी हे पद स्टीव बामर आणि कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांच्याकडे होतं.
Esakal