प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा आई होणार आहे. लिसा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. लिसा तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो नेहमी शेअर करत असते.लिसाने नुकतेच सोशल मीडियावर मैत्रिणींसोबत साजरे केलेल्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.लिसाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती मैत्रिणींसोबत टेबलावर हातात वाईनचा ग्लास घेऊन बसलेली दिसत आहे. या फोटोला लिसाने कॅप्शन दिले की,’हे फोटो काढत असताना मी वाईन घेतली नाही’बेबी शॉवरसाठी लिसा आणि तिच्या मैत्रिणींनी पांढऱ्या रंगाचे ड्रेस परिधान केले होते.लिसाने बेबी शॉवरसाठी डोक्यावर पांढऱ्या, गुलाबी रंगाच्या फूलांचा क्राऊन आणि पांढऱ्या रंगाचा शोर्ट ड्रेस असा लूक केला होता. चॉकलेट केक आणि गुलाबी रंगाच्या मिरिंग्यू कूकीजचे फोटो देखील लिसाने शेअर केले आहेत.