जळगाव : एसबीआय लाईफ इन्श्युरन्स पॉलीसी एजंट कोड आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसा डबल करुन देण्याच्या आमिषाने वामन काशिराम महाजन(अंतुर्ली) या शेतकर्याची (Farmer) तब्बल १ कोटी, ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांत फसवणूक झाली. मुक्ताईनगर पोलिसात(ता.७ मार्च) (Muktainagar Police) दाखल गुन्ह्यात (Crimes case) सायबर पोलिसांनी तब्बल तीन दिवस दिल्लीत (Delhi) तळ ठोकून सायबर गँगचा म्होरक्या (Cyber gang leader) विकास कपूर सुरिंदर कपूर गँगचा म्होरक्या विकास कपूर सुरिंदर कपूर यास अटक केली. (delhi cyber criminal caught by jalgaon police)
Also Read: बीएचआर प्रकरणी बड्या व्यावसायिकांसह राजकीय हस्ती ताब्यात !
अंतुर्ली(ता.मुक्ताईनगर) येथील केळी उत्पादक शेतकरी वामन काशिराम महाजन यांना वर्ष २०१४ मध्ये त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. एसबीआयल लाईफ इन्श्युरन्स पॉलीसी एजंट कोड, व म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैस डबल मिळवून देण्याचे आमिष दाखविले. महाजन यांना संबंधितांनी आपण स्टेट बँकेचेच अधिकारी असल्याचे सांगत पंकज कुमार, हरबंसवाल, कविता, समीर मेहरा, शुक्ला, एस.पी.सिन्हा, रिया मेहता अशा वेगवेगळ्या नावांच्या व्यक्तींनी संपर्क साधला. वेळोवेळी संपर्क साधून फंड रिलिफ करण्यासाठी पैसे ऑनलाईन पैसे भरण्यास बाध्यकेले. संबंधितांनी महाजन यांना तब्बल वेगवेगळ्या ३५ बँकाच्या खात्यांमध्ये पैसे भरायला लावले. विशेष म्हणजे तूमचा चेक तयार आहे..असे सांगत खोट्या चेकचे फोटो टाकून, मोहीत केले. महाजन यांनीही संबंधितांनी सांगितल्याप्रमाणे ३५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये (२०१४ ते २०१९) या काळात १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ एवढी रक्कम आरटीजीएस, निफ्टद्वारे जमा केली.

मुलाच्या शंकेतून उलगडा
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वडील नेमकी कुणाला रक्कम देताय, याबाबत महाजन यांच्या मुलाला शंका आली. त्याने याबाबत विचारण केली. यात अशाप्रकारे पैसे डबल मिळत नसतात, तसेच संबंधितांकडून आपल्या वडीलांची फसवणूक होत असल्याचा प्रकार लक्षात आला. बदनामी होईल म्हणून सुरुवातीला महाजन यांनी तक्रार देणे टाळले. मात्र, सायबर पोलिसांनी विश्वासक अश्वासन दिल्याने वामन महाजन( ७ मार्च २०२०) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. दाखल गून्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सायबर पोलीस स्टेशनला वर्ग करुन तपासाचे आदेशीत केले. अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी तपासाचे नियोजन करत होते.
Also Read: आदिवासी आश्रमशाळेचा विद्यार्थी जगविख्यात कंपनीचा बनला डायरेक्टर
जळगाव पोलिसांचा दिल्लीत सरंजाम
सायबरचे निरिक्षक बळीराम हिरे, उपनिरिक्षक अंगत नेमाने, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, दिपक सोनवणे, अरविंद वानखेडे अशांचे पथक संशयिताच्या शोधार्थ दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. तब्बल तीन दिवस पथकाने दिवसरात्र एक करुन दिल्लीसह गाझीयाबाद, नोयडा, पालम व्हिलेज अशा ठिकाणांवर धडक दिली. दिल्लीतील पालम या गावातच(१४ जून) संशयित विकासकपूर, सुरिंदर कपूर याच्यावर झडप घातली. अटकेनंतर पथक आज बुधवारी जळगावात परतले. संशयितास मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता, त्यास २५ जून पर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ठगबाज विकास कपूर याच्या बारा लोकांच्या टोळीने राजस्थानमध्येही एक कोटी ३५ लाख रुपयांत एकाला गंडवले असून राजस्थान पेालिस त्याच्या मागावर आहेत.
Esakal