मुंबईच्या सेना भवन राड्यानंतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी दिलं खुलं आव्हान

मुंबई: “राडेबाजी (Hooliganism) हीच शिवसेनेची (Shivsena) पहिल्यापासूनची संस्कृती (Culture) आहे आणि आता महिलांवर अत्याचार (Misbehave with females) , महिलांवर हात उचलणे ही शिवसेनेची संस्कृती झाली आहे. तुम्ही राड्याची तारीख सांगा. आम्ही आमच्या विकासकामांच्या तारखा सांगतो”, असं खुलं आव्हान भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल देसाई यांनी शिवसेनेला दिलं. (Fights Hooliganism Misbehavior with females is Shivsena New Culture slams BJP Leader Sheetal Desai)

Also Read: मुंबईकरांनो सावधान! पावसाबद्दलची ही बातमी नक्की वाचा

बुधवारी दादरच्या सेनाभवनासोर शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. नंतर, भाजप नेत्यांनी शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ, असे सांगितल्याचा दावा करून शिवसेना प्रवक्त्या श्रीमती संजना घाडी यांनी भाजप ला इशारा दिला होता. भाजपच्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ व तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर देसाई यांनी आपलं मत व्यक्त केलं.

शिवसेनेच्या संजना घाडी आणि भाजपच्या शीतल देसाई

“महिलांवर हल्ले करणे ही संस्कृती शिवसेनेने आताआताच आत्मसात केली आहे. ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला या म्हणीचा प्रत्यय शिवसेनेकडे बघून येतो. आपल्या नव्या राजकीय दोस्तांचा गुण शिवसेनेलाही लागला आहे. शांततापूर्ण आंदोलन ही आमची संस्कृती आहे, लोकशाहीत आंदोलने करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. भाजपच्या आंदोलनाला शिवसेनेने हिंसक मार्गाने प्रत्युत्तर दिले. मुद्दे संपले की गुद्दे सुरु होतात, हे सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. हिंसक प्रत्युत्तर दिल्यावर भाजपचा कोणीही कार्यकर्ता अरे ला का रे म्हणणारच. त्यामुळे शिवसेनेने प्रथम आपल्या नव्या दोस्तांकडून अहिंसेचे तत्व शिकावे”, असा खोचक सल्ला देसाई यांनी दिला.

Also Read: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक; पुरावे नष्ट केल्याचा आरोप

“तीन पक्षांच्या तिघाडी सरकारने महाराष्ट्राचे मातेरे करून ठेवले आहे. महिलांवर अत्याचार, आपदग्रस्तांची थट्टा, शेतकऱ्यांवर अन्याय, वाढते कोरोनाबळी, लशींच्या ग्लोबल टेंडरना कोणीही हिंग लावूनही न विचारणे, तुंबणारी मुंबई ही त्यांची प्रमुख कामे आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही स्वबळावर तसेच केंद्राच्या साह्याने राज्यातही विकासकामे करीत आहोत व ती करीतच राहणार आहोत. आम्ही त्या विकासकामांच्या तारखा तुम्हाला सांगू, तुम्ही राड्याच्या तारखा सांगा. विनाकारण राडेबाजी करण्यात आम्हाला रस नाही. आम्हाला त्याहीपेक्षा महत्वाची जनसेवा आणि विकासकामे आहेत”, असे देसाई यांनी शिवसेनेला बजावले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here