सातारा जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु असून आज पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून नदी, नाले तु़डूंब भरुन वाहू लागली आहेत. गेल्या दोन दिवसात कोयना धरणाच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली असून या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
भांबवलीत धुवांधार पाऊस कोसळत असून तांबी-भांबवलीदरम्यान घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर-तापोळा रोडवर वाघेरा या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्याने स्थानिकांनी दगड-माती हलवून रस्ता पूर्ववत केला. यात बालचमूंचाही सहभाग होता.
भुडकेवाडी (ता. पाटण) येथील ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने कोंजवडे-मुरुड मार्ग ठप्प होऊन वाहतूक खोळंबली आहे.
सातारा शहरातील शाहूनगर (शिंदे काॅलनी) भागात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने पादचारी, प्रवाशांसह वाहनधारकांची कुंचबणा झाली आहे.
वनकुसवडे पठार परिसरात ढगफुटी होऊन ओढे शेतातून वाहू लागल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील अनेक मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here