मुंबई – विज्ञानविषयक मालिकांमध्ये रुची असणा-यांची काही कमी नाही. जगभरात अशा मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांची लोकप्रियताही मोठी आहे. आपण अशाच सर्वोत्तम दहा विज्ञानविषयक मालिकांची माहिती आता घेणार आहोत.ज्या मालिकांनी लहानांपासून मोठ्यांच्या मनावर अधिराज्य केले.

2019 मध्ये आलेल्या या मालिकेनं कमालीची लोकप्रियता मिळवली होती. एका वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या या मालिकेनं अनेक रेकॉर्ड केले होते. अॅनिमेशनचा पुरेपूर वापर मालिकेत करण्यात आला होता. या मालिकेचे एकूण 18 एपिसोड तयार करण्यात आले होते. त्यात 18 वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या…

ही सिरिज देखील सायन्स फिक्शनवर आधारित होती. फँटसी प्रकारात मो़डणारी ही मालिका एका नर्सची आहे. त्यात दरवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. प्रेक्षकांना धक्का देणा-या अनेक घटना त्यात सातत्यानं घडतात. त्या प्रेक्षकांच्या मनाचा ताबाही घेतात.

सायन्स फिक्शन प्रकारातील एक कॉमेडी जर तुम्हाला पाहण्यात रस असेल तर नक्की अपलोडच्या वाटेला जा. 2020 मध्ये ती आली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ही एका व्यक्तीची गोष्ट आहे. त्यात त्या व्यक्तीचा अॅक्सिडंट होतो. त्यात त्याला आपण वाचू याची शक्यता नसते. त्यानं ती अपेक्षाही सोडली असते. मात्र त्याचे मित्र त्याला वाचवतात.

2015 मध्ये आलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांना वेड़ लावलं होतं. क्राईम, ड्रामा, सायन्स याच्यावर आधारित लिमिटलेसनं वेगळ्या विषयाची मांडणी या सिरिजच्या माध्यमातून केली होती. एका 28 वर्षांच्या मुलाची गोष्ट त्यात मांडण्यात आली आहे. तो एक गोळी घेतो त्यामुळे तो सुपर ह्युमन इंटेलिजन्स होतो. असे त्यात सांगण्यात आले आहे.

ड्रामा आणि फँटसी यांचे मिश्रण असलेली द मॅजिशियन ही मालिका मुलांच्या भावविश्वाचा ताबा घेते. आपण आतापर्यत ऐकलेल्या जादूच्या गोष्टी या काही खोट्या नाहीत असे त्यात सांगण्यात आले आहे. प्रभावीपणे या कथेची मांडणी करण्यात आली आहे.

कॅस्टल रॉक ही मालिका 2018 मध्ये आली होती. त्यात एका 12 वर्षांच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. तो मुलगा अचानक गायब होतो. आणि 18 दिवसांपर्यत तो काही सापडत नसल्याचे लक्षात येते.

अॅडव्हेंचर, ड्रामा आणि फॅमिली सीरिजमध्ये रस असणा-यांसाठी ही मालिका बेस्ट ऑप्शन आहे. स्पेस मिशनमध्ये काही लोकांना पाठवले जाते. मात्र ती लोकं एलियन्सला भेटतात आणि पुढे जे होतं ते मालिकेत पाहण्यासारखे आहे.

2013 मध्ये आलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. एका शहरातून सुरु होणारी कथा वेगळ्याच वळणावर येवून थांबते. रहस्यमयी मालिकांमध्ये रुची असणा-यांसाठी ही मालिका निखळ आनंद देणारी आहे. असे सांगावे लागेल…

बंदीवान जेल मधून सुटण्यासाठी सतत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात. अशावेळी एका कैद्याला वेगळीच पावर मिळते. आणि त्यानंतर तो जे काही करतो ते या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे.

2019 मध्ये आलेल्या व्ही वॉर्सनं लोकप्रियतेचा वेगळा विक्रम केला होता. दोन मित्र कुठे जातात आणि ते जीवघेण्या व्हायरसच्या मदतीनं एक्सपोज होतात. राक्षस आणि माणसं यांच्यातील संबंधावर भाष्य करणारी ही मालिका होती.
Esakal