प्रसिद्ध गायक रोहित राऊत हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्यासाठी त्याला प्रेक्षकांची दादही मिळते. ‘सारेगमप लिटील चॅम्प’ या शोमुळे रोहितला विशेष लोकप्रियता मिळाली.नुकताच रोहित एका गायिकेला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगतेय. ती गायिका म्हणजे जुईली जोगळेकर. जुईलीसोबतचे फोटो रोहित नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतो. रोहित आणि जुईली अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले आहेत. जुईलीने अनेक मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत अशी चर्चा आहे.