काले (सातारा) : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव सुरू असताना होत असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Factory) निवडणुकीत प्रचाराचा ‘ट्रेंड’ बदलतोय. कारखाना निवडणुकीत गावोगावी पोस्टरबाजी, झेंडे, खिशाला बिल्ले, डोक्यावर टोप्या, रिक्षातून स्पीकर भोंगा अशा दिसणाऱ्या प्रचारावर कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. प्रचाराचा ‘ट्रेंड’ इतका बदलला, की सोशल माध्यमांसह (Social Media) मास्कद्वारेही (Mask) प्रचार होतो आहे. पॅनेलचा झेंडा असलेला मास्कचा नवा फंडा आला आहे. (Changing Trends Of Election Prevote Due To Coronavirus Satara Political News)

कृष्णा कारखाना निवडणूक म्हणजे जिल्ह्यासह तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघते.

कृष्णा कारखाना निवडणूक (Krishna Factory Election) म्हणजे जिल्ह्यासह तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघते. सत्तांतराचा इथला ‘ट्रेंड’ आहे. कारखान्यात १९८९ नंतरच्या निवडणुकीत दोघांतील सत्ता संघर्ष वाढला. अनेक फंडे वापरून प्रचार झाला. सुरवातीला बैलगाडीतून (Bullock cart) प्रचार झाला. गावोगावी सभा, गावरान घोषणाबाजी, शेतकरी मेळावे, जेवणावळी, ट्रक, ट्रॅक्टर रॅली, कापडी फलक, भिंतीवर प्रचाराची निशाणी रंगवणे, झेंडे लावणे, हारतुरे, फटाके, मोफत साखर वाटप, चिकन, मटण वाटपापासून निशाणी साहित्य वाटप, गुलालाची उधळणीचे फंडे वापरले गेले. २०१० मध्ये अविनाश मोहिते यांच्या ‘एन्ट्री’नेही प्रचाराचा नवा फंडा समोर आला. त्या वेळी नारळाचा जोर होता. प्रचारात सभा गाजल्या. स्टार प्रचारक उदयास आले.

Also Read: ‘कृष्णा’त काँग्रेसची मते विभागणार; मंत्री कदमांनंतर उंडाळकरांची भूमिका जाहीर

Mask

शिट्ट्या टाळ्या अन् घोषणाबाजी जागी झाली. पोस्टरबाजीतून डिजिटल फ्लेक्स आले. प्रचाराचा ‘ट्रेंड’ काळानुसार बदलत गेला. सध्या डिजिटलचा जोर आहे. प्रत्येकाचा सोशल मीडियाचा, यू ट्यूब, न्यूज नेटवर्क वापरून प्रचार सुरू आहे. पॅनेलची छबी लोकांपर्यंत पोचवू लागले आहेत. सध्या कोरोनाचाही प्रभाव आहे. कोरोनामुळे मास्क आले. तोच धागा पकडून निवडणुकीत प्रत्येकाला मास्क सक्तीचा झाला. तोच नवा फंडा प्रचाराचाही ‘ट्रेंड’ झाला आहे. प्रचारात पॅनेलच्या झेंड्याचे मास्क आले आहेत. अजूनही १५ दिवस प्रचाराची रणधुमाळी उठणार आहे. त्यामुळे सभासदांना अजून कोणकोणते गरजेची वास्तू मिळणार हे पाहणेच उचित ठरणार आहे.

Changing Trends Of Election Prevote Due To Coronavirus Satara Political News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here