मुंबई – महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा, मुलाखती आणि निकालासंदर्भात आता नवं परिपत्रक काढण्यात आलं आहे. यामध्ये MPSC साठी पात्र ठरलेल्या SEBC उमेदवारांना EWS किंवा ओपन प्रवर्गात बदल करण्यासाठी परिपत्रक काढलं आहे. यामध्ये SEBC उमेदवारांना प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक सुरु करण्यात आल्याची माहिती दिली आहे. हा बदल करण्यासाठी 17 ते 23 जूनपर्यंत मुदत असणार आहे. उमेदवारांना ओपन किंवा EWS यापैकी एक पर्याय निवडता येणार आहे.

आयोगामार्फत डिसेंबर, २०१८ नंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित पदांच्या आधारे भरतीप्रक्रिया झाली. या भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यावर प्रलंबित असलेल्या व शिफारशी करण्यात न आलेल्या केवळ खालील संवर्ग/परीक्षांच्या बाबतीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांना हा EWS किंवा ओपन असा पर्याय निवडायचा आहे.

Also Read: ‘डिस्टन्स’मधून B.Ed करायचं आहे? जाणून घ्या किती वर्षाचा कोर्स अन् महत्वपूर्ण माहिती

Also Read: सरकार तुमचं ऐकतंय, मग आंदोलन कशाला? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी ज्या पदभरती/परीक्षांकरीता अर्ज केला आहे. त्या प्रत्येक पदभरती परीक्षांकरीता ओपन किंवा EWS यांपैकी पर्याय निवडायाचा आहे. त्यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘Online Facilities’ या पर्यायावर क्लिक करा. तिते SEBC Option Change” वर क्लिक करुन पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी.

(१) उपरोक्त पदभरती / परीक्षांपैकी अर्ज केलेल्या पदभरती / परीक्षेची जाहिरात निवडावी.

(२) अर्जामध्ये नमूद केलेला मोबाईल क्रमांक नोंदवून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ठ करून लॉगिन

(३) अराखीव (खुला) / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी सुयोग्य पर्याय निवडावा.

(४) ‘Submit’ बटणावर क्लिक करुन निवडलेला तपशील सादर करावा.

करावे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here