नगर शहरातील सर्वाधिक १४९ रुग्णांचा समावेश आहे. शहराखालोखाल पारनेर व नगर तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे.

अहमदनगर : नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाबाधित (Corona) रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण (Patient) आढळून येण्याचा गुरुवारी (ता. १७) उच्चांक वाढला आहे. दिवसभरात ६७९ नवे रुग्ण (New Patient) आढळले आहेत. यामध्ये नगर शहरातील सर्वाधिक १४९ रुग्णांचा समावेश आहे. शहराखालोखाल पारनेर व नगर तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. (the number of corona is increasing in ahmednagar district)

Also Read: 40 वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर भाजप सत्तास्थानी; अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची खडतर वाटचाल

नगर शहरात बुधवारी (ता. १६) अवघे ११ रुग्ण आढळले होते. गुरुवारी (ता. १७) १४९ नवीन रुग्ण आढळले. पारनेर तालुका रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पारनेर तालुक्‍यात सरासरी २०-२५ रुग्ण आढळून येत होते. तालुक्‍याने पुन्हा शंभरी ओलांडली. नगर तालुक्‍यात बुधवारी अवघे १४ रुग्ण होते. नगर तालुका रुग्णसंख्येत तिसऱ्या क्रमांकावर आला असून तेथे ६४ रुग्ण आढळले. अकोले आणि जामखेड हे दोन तालुके वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.

Also Read: आमदारांपेक्षा आम्ही जास्त कामं केली; अहमदनगर झेडपी सभापती काशिनाथ दाते

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत आठ, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १४५, तर रॅपिड अँटिजेन चाचणीत ५२६ रुग्ण आढळून आले. कोरोनावर उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या तीन हजार ४४७ झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांनी पावणेतीन लाखांचा टप्पा आता गाठला आहे. आतापर्यंत दोन लाख ७४ हजार ५५८ व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांपैकी पाच हजार ३३८ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. दिवसभरात कोरोनातून ६८१ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत दोन लाख ६५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले आहेत.

Also Read: कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि”र्बंद”, कापडबाजारात शुकशुकाट

तालुकानिहाय रुग्ण

नगर शहर १४९, पारनेर १०२, नगर तालुका ६४, पाथर्डी ४९, राहुरी ४७, शेवगाव ४७, संगमनेर ३५, राहाता ३३, श्रीगोंदे ३२, नेवासे २१, कर्जत १९, श्रीरामपूर १९, अकोले १६, जामखेड नऊ, कोपरगाव सात, भिंगार छावणी परिषद हद्द चार. परजिल्ह्यांतील २६ रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे.

उच्चांकी ३९२ मृत्यूंची नोंद

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या सद्यःस्थितीची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जात आहे. या पोर्टलवर गुरुवारी ३९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांतील मृत्यूंची ही संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाच हजार ३३८ झाली आहे. (the number of corona is increasing in ahmednagar district)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here