नंदुरबार : ग्रामस्थ, ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले व लसीकरण होत असल्याने कोरोनाचा (Corona) कहर कमी होऊ लागला आहे. आता बोटावर मोजण्याइतपत रुग्ण (Patient) उपचार घेत असून, तेही लवकरच बरे होऊन घरी परततील. त्यामुळे जिल्ह्या‍तील ४८९ पैकी ४६५ ग्रामपंचायती कोरोनामुक्त (Corona Free) झाल्या आहेत. केवळ २४ गावांत ४७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. (nandurbar district fore hundred sixty five gram panchayats corona free)

Also Read: धुळे जिल्ह्यातून पंतप्रधान मोदींना एक लाख पत्र

सव्वा वर्षात जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच कहर केला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी चांगले नियोजन केले. डॉक्टरांची कमतरता, कर्मचाऱ्यांचा अभाव, सोयी-सुविधांची वानवा असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, पोलिस दल व प्रशासनाची सांगड घालून कोरोनाकाळात हाताबाहेर गेलेली परिस्थिती सुयोग्य रितीने हाताळली. त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करीत गाव, वस्ती, पाडा, मोहल्ला, अशा प्रत्येक ठिकाणी नियमांचे पालन व अंमलबजावणी केली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लवकर नियंत्रणात आला. मृत्यचा दर कमी झाला. आजअखेर केवळ ९४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये परस्पर उपचार घेणारे, बाहेरगावी व परराज्यात जाऊन उपचार घेताना बळी गेलेल्या रुग्णांच्या आकड्याचा विचार केल्यास मृत्यूची संख्या वाढू शकते. जिल्ह्यात २४ ग्रामपंचायती अद्याप कोरोनामुक्त होणे बाकी आहे. त्याही लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

corona free

मृत्यूसत्र थांबले…
आतापर्यंत जिल्ह्यात ४० हजार २११ जणांनी कोरोनाने ग्रासले होते. त्यांचा पॉझिटिव्ह दर १८.१३ टक्के आहे. मृत्यूचा दर २.३५ टक्के, तर बरे होण्याचा दर ९७.२९ टक्के आहे. शहरी व ग्रामीण भाग मिळून आजघडीला केवळ ११३ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, मृत्यूचे सत्र थांबले आहे.

Also Read: आईचा मृत्‍यू, दुसरीकडे मुलीचे लग्‍न; विवाहानंतर अंत्‍ययात्रा

तालुकानिहाय आकडेवारी

नंदुरबार १३५ १२६ ९ १४
नवापूर १०५ ९७ ८ १६
शहादा ११४ १०९ ५ १५
तळोदा ५४ ५३ १ १
अक्कलकुवा ४७ ४६ १ १
धडगाव ३४ ३४ ० ०
——————————-
एकूण ४६५ २४ ४७

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here