कास (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री पासून मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. यामुळे नदी नाले तुडूंब भरले आहेत. सातारा तालुक्यातील कास परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव (kass lake) पूर्णपणे भरला असून सांडव्यावरून पाणी ओव्हरप्लो होवून वाहू लागले. कास तलावातून जाणारे पाणी पुढे वजराई धबधब्याच्या (vajrai waterfall) रूपात कोसळत असल्याने भांबवली वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने वाहणार आहे. (satara-rain-update-kass-lake-overflow-tourisim)
सातारा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कास धरण उंची वाढवण्याचे काम चालू आहे. यावर्षीही हे धरणाचे काम पूर्ण न झाल्याने पाणीसाठा व साठवण क्षमता जैसै थे राहणार आहे. यावर्षी सातत्याने होत असलेल्या पावसाने कासची पाणीपातळी हे महिन्यात ही समाधानकारक होती.
Also Read: राज्यमंत्री विश्वजित कदम नाराज
सलग होत असलेल्या पावसाने जुलैमध्ये भरणारा तलाव यावर्षी रेकाॅर्डब्रेक जून महिन्यातच भरला आहे. कास तलाव भरल्याने वजराई धबधब्याचा प्रपात ओसंडून कोसळणार आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Also Read: 169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा
दरम्यान काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कास धरणाची उंची वाढविण्याचे कामाची गती मंदावली हाेती. याबराेबरच काही वेळेला निधीची कमतरता भासत हाेती. हा तलाव ब्रिटीश कालीन आहे. या तलावातून साता-यासह नजीकच्या 15 गावांना पिण्याचे पाणी नागरिकांना पूरविले जाते. हा तलाव सन 1885 कालावधीत बांधण्यात आला. याची क्षमता 107 दक्ष लक्ष घनफूट इतकी आहे. कास धरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर म्हणजेच धरणाच्या भितींची उंची 12.36 मीटर वाढणार आहे.
पाणी साठ्याची क्षमता वाढणार असल्याने सातारकरांचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे उरमाेडी धरण विभागाचे शाखा अभियंता अरिफ माेमीन यांनी ई-सकाळशी बाेलताना दिली.

दरम्यान या पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर ओढ्यांचे पाणी मोर्यांमधे न बसल्याने रस्त्यावर आले. संरक्षक भिंतीचे पण नुकसान झाले. कास परिसरातील प्रसिद्ध असणारा एकीवचा धबधबा ओसंडून वाहत होता. माेठ्या प्रमाणात एकीव सातारा या डांबरी रस्त्यावर पाणी आले.
Esakal