एक ते दोन फूट उंचीच्या सुमारे ऐंशी मूर्ती श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपातील एका ओवरीत ठेवण्यात येणार असून भाविकांना काचेतून त्या पाहता येणार आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता सातशे ते एक हजार वर्षापूर्वीच्या विविध धातूंपासून बनवलेल्या अतिशय सुंदर मूर्तीं पाहता येणार आहेत. एक ते दोन फूट उंचीच्या सुमारे ऐंशी मूर्ती श्री विठ्ठल मंदिरातील (shri vitthal temple) सभा मंडपातील एका ओवरीत ठेवण्यात येणार असून भाविकांना काचेतून त्या पाहता येणार आहेत.(devotees will now visit the rare metal idols at the shri vitthal temple in pandharpur)

Also Read: पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी करणार प्रयत्न

पूर्वी काही कारणाने काही घराण्यातील वंश खंडीत झाला, घरातील मूर्तींचे पूजन करण्यात अडचणी येऊ लागल्या किंवा काही कारणाने घरात नवीन देवदेवतांच्या मूर्ती आणल्या तर पूर्वी मूर्ती समुद्रात अथवा नदीच्या पाण्यात विसर्जीत केल्या जात असत. काही लोक या मूर्तींचे विसर्जन न करता प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या मंदिरात नेऊन देत असत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येताना काही भाविक घऱातील या जुन्या मूर्ती आणून जमा करत असत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरीजवळ मंदिराच्या भिंतीलगत गावोगावच्या लोकांनी दिलेल्या अनेक धातूंच्या मूर्तीं असलेले 33 कोटी देवतांचे छोटे मंदिरच होते. सुमारे सातशे, आठशे वर्षापासून पंढरपूर मधील बैरागी घराण्याकडून अशा मूर्तीं श्री संत नामदेव पायरी जवळ स्विकारुन त्या मूर्तींचे पूजन केले जात होते.

Also Read: पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने 1997 च्या सुमारास संत नामदेव महाव्दाराचे बांधकाम सुरु केले. तेव्हा हे मंदिर पाडावे लागले. भिंती लगत असलेल्या या मंदिरातील सुमारे अडीचशे ते तीनशे मूर्ती मंदिर समितीने ताब्यात घेतल्या होत्या.

श्री विठ्ठल रुक्मिणी, गणपती, श्री विष्णू, श्री कृष्ण, बालाजी अशा अनेक देवदेवतांच्या एक ते दोन फूट उंचीच्या या अतिशय सुरेख आणि कोरीव मूर्ती आहेत.

Also Read: Video : तिरंगी रंगला पांडुरंग; विठ्ठलाच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट

तांबे, पितळ आणि पंचधातूंच्या या सर्व मूर्तींचे चांगल्या रितीने जतन व्हावे आणि त्या भाविकांना पाहता याव्यात, यासाठी त्यामूर्तींना पाॅलिश करुन त्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत. त्यातील निवडक 80 मूर्ती भाविकांना पाहण्यासाठी मंदिरातील सभामंडपातील एका ओवरीमध्ये काचेत ठेवण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाच्या सावटामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी आहे, परंतु मंदिर जेंव्हा भाविकांसाठी खुले होईल, तेव्हा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विविध देवतांच्या या मूर्ती पाहण्याची संधी मिळणार आहे.

विविध देवतांच्या सुमारे अडीचशे ते तीनशे मूर्ती आहेत. त्यापैकी काही एक ते दोन फूट उंचीच्या अतिशय सुरेख मूर्ती आहेत. त्यातील सुमारे ऐंशी मूर्ती निवडण्यात आल्या असून भाविकांना त्या काचेतून पहाता येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. (devotees will now visit the rare metal idols at the sri vitthal temple in pandharpur)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here