अभिनेता अक्षय कुमारने गुरुवारी भारतीय सैन्य दलातील जवानांची भेट घेतली. यावेळी त्याने काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील एका गावात शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगीही दिली.

नीरु गावातील सीमा सुरक्षा दलासह भारतीय सैन्य दलाच्या इतर जवानांची भेट घेऊन अक्षयने त्यांना प्रोत्साहन दिलं.
अक्षयने सैनिक आणि स्थानिक लोकांसह भांगडासुद्धा केला.
अक्षयने देशाच्या सूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. बीएसएफने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले.
अक्षय कुमारने शाळा बांधण्यासाठी दिलेल्या देणगीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
अक्षय कुमारच्या भेटीचा व्हिडीओसुद्धा बीएसएफ काश्मीरच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here