महाबळेश्वर (सातारा) : मुंबई-पुण्यातील कोरोना नियम (Corona Rules) शिथिल झाल्यामुळे तेथील अनेकजण सहलीसाठी विकेंड (Weekend Trip) सुट्टीत महाबळेश्वर, पाचगणी परिसरात हजेरी लावत आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली आहे. दरम्यान, वाढत असलेल्या गर्दीबाबत प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Bollywood Actress Urmila Matondkar) यांनी चिंता व्यक्त केली असून सहलीला येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाबाबतच्या (Coronavirus) सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी पर्यटकांना केलेय. (Actress Urmila Matondkar Appeals Tourists To Follow Guidelines Covid 19 Mahabaleshwar)
काही भागात लॉकडाउन उठविला गेला असला, तरी महाबळेश्वर परिसरात मजा करायला येत असला, तर कृपया कोरोना बाबतची सावधानता बाळगायला हवी, असे आवाहन बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केली.
बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर या आपल्या कुटुंबीयासोबत काही दिवसांपासून महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील (Mahabaleshwar-Panchgani Area) एका बंगल्यामध्ये विश्रांतीसाठी मुक्कामी आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यशवंतराव घाडगे यांच्यासह महाबळेश्वर येथील पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी चर्चा करताना त्यांनी गर्दीबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी पत्रकार विलास काळे, संजय दस्तुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, प्रभाकर देवकर, शिरीष गांधी, दिनेश फळणे आदी उपस्थित होते.
Also Read: राब्ता : कृति सेनन नाही, तर आलियाच होणार होती सुशांतची ‘हिरोईन’; पण..

त्या पुढे म्हणाल्या, पर्यटकांनी थोडा संयम पाळायला हवा व कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. मास्क घालणे, गर्दी न करणे, सामाजिक अंतर पाळणे या बाबतही खबरदारी घेतली पाहिजे. तसेच स्वतःची व आपल्या मुलाबाळांची काळजी घ्यायला हवी. महाबळेश्वर परिसरातील नागरिकांनाही काही होणार नाही, या बाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोना अद्याप गेला नाही. मात्र, काही भागात लॉकडाउन (Corona lockdown) उठविला गेला असला, तरी महाबळेश्वर परिसरात मजा करायला येत असला, तर कृपया कोरोना बाबतची सावधानता बाळगायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
Actress Urmila Matondkar Appeals Tourists To Follow Guidelines Covid 19 Mahabaleshwar
Esakal