सिंधुदूर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आलेल्या जाहिरातीवरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने पहिल्यापासूनच या प्रकल्पाला विरोध केला आहे. परंतु, प्रकल्पासंदर्भात सामनात एक जाहीरात प्रसिध्द झाली. त्यामुळे थेट शिवसेनेच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली जाऊ लागली. मात्र, या प्रकरणावर खुलासा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पाला आपला कायम विरोध असल्याचे सांगितले.
सिंधुदूर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी याआधीही नाणारला विरोध होता आणि यापुढेही असेन अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यींनी मांडली.
हे पण वाचा – मी स्वप्न दाखवणार नाही पूर्ण करणार…
या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने शिवसेनेची भूमिका बदलली का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी ‘मी पक्षाचा प्रमुख आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचे धोरण मी ठरवितो. निर्णय मी घेतो. सामना वर्तमानपत्राचे जाहिरातदार हा निर्णय घेत नाहीत. रिफायनरी बाबत काहीही चाललेले नाही, असे सांगितले. यावेळी शिवसेना पक्षाचेच प्रतिनिधी रिफायनरी व्हावा, अशी मागणी करीत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, माझ्याकडे अद्याप कोणतीही मागणी आलेली नाही असे त्यांनी सांगितले.
नाणार प्रकल्पाला आधीही शिवसेनेचा विरोध होता आणि यापुढेही तो राहिले. आणि रिफायनरीचा विषय हा कधीच बंद झाला आहे. त्यावर आता बोलून काही फायदा नाही’ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
हे पण वाचा – भिमा -कोरेगावचा तपास केंद्राकडे देणार नाही – मुख्यमंत्री
दरम्यान, सामनातील नाणार जाहिरातीमुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसारखा दिशाभूल करणारा माणूस नाही. आधी नाणारला विरोध केला आता जाहिरात छापली. उद्धव ठाकरे दुतोंडी माणूस, अशी टीका राणे यांनी केली होती.

News Story Feeds