उस्मानाबाद: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी दुपारी बीड येथील दौरा आटोपून उस्मानाबाद जिल्ह्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात येतात त्यांचे स्वागत पावसाने केली. यावेळी गार्ड ऑफ ऑनर (Guard of honour) देण्यासाठी पोलिस कर्मचारी थांबले होते. प्रोटोकॉलनुसार पोलिसांकडून उपमुख्यमंत्री पवार यांना मानवंदना देण्यात येणार होती.

मात्र ज्या वेळेस पवार यांचा वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्या वेळेला मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला होता. पावसामुळे पोलीस पावसापासून बचाव व्हावा म्हणून आडोशाला थांबले होते. श्री पवार यांच्या गाडीचा ताफा येताच सर्व पोलिस कर्मचारी मानवंदना देण्याच्या तयारीला धावले. त्याचवेळी पवार मोटारीतून खाली उतरले. पाऊस जोरात सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी पावसात भिजू नका, असे सांगत आतमध्ये आडोशाला जायचा सल्ला दिला
Also Read: औरंगाबाद जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! अद्याप कारवाई नाही
श्री पवार यांच्या या मानुसकीच्या दर्शनाची चर्चा पोलिसांच्या वर्तुळात बराच काळ सुरू होती. अखेर मानवंदना न स्वीकारतात पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप आढावा बैठकीला गेले.
Esakal