‘कॉफी विथ सकाळ’मध्ये बोलताना शिवसेनेला दिला सज्जड दम

मुंबई: राज्यात सध्या भाजप विरूद्ध महाविकास आघाडी (BJP vs MVA Govt) सरकार असा सामना पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांवर भाजपचे दोन विरोधी पक्षनेते तुटून पडतात असं चित्र गेल्या काही महिन्यांपासून आपण सारेच पाहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारबद्दल नेमकं काय खटकतं? राज्य कारभारासाठी काय गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत? या आणि अशा विविध विषयांवर राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज ‘कॉफी विथ सकाळ’ (Coffee with Sakal) कार्यक्रमात दिलखुलास मतप्रदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना आणि शिवसैनिक यांच्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलावर सडेतोड भाष्य केले. (Coffee with Sakal Pravin Darekar Warning CM Uddhav Thackeray led Shivsena if they will attack BJP will give befitting reply)

Also Read: कांदिवली बनावट लसीकरण घोटाळ्याप्रकरणी चौघांना अटक

मुंबईतील शिवसेना भवनजवळ बुधवारी सेना-भाजप कार्यकर्ते आपसांत भिडले. तशातच दुसऱ्या दिवशी (गुरूवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या साऱ्या मुद्द्यावर दरेकर म्हणाले, “शिवसेनेची आधीची नेतेमंडळी आणि आजची नेतेमंडळी यांच्यात खूप फरक पडला आहे. ते सध्या सत्तेत आहेत. अशा वेळी त्यांनी गुंडगिरीचे समर्थन करणे हे चुकीचे आहे. त्यात मुख्यमंत्यांनी त्यांचे स्वागत करणे यातून खूपच चुकीचा संदेश जातो. शिवसैनिकांची वृत्ती आता पहिल्यासारखी उरली नाही. सामाजिक बांधिलकी ही शिवसेनेची ताकद होती पण आता मात्र अस्मिता आणि सामाजिक ताकद त्यांच्यात राहिली नाही.”

Also Read: Break the Chain: मुंबईचा अखेर पहिल्या स्तरात समावेश

शिवसेना-भाजप शाब्दिक युद्ध

Also Read: “तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही…”; शिवसेनेला ‘चॅलेंज’

“सामना’मध्ये नेहमी आमच्याविरोधात गरळ ओकली जाते. त्याचा हा राग होता. आमचा राम मंदिरासंदर्भात चौकशीला आक्षेप नाही. पण तुम्ही दादागिरी कराल तर आम्ही शांत बसणार नाही. आधी प्रसाद दिलाय आणि आता शिवभोजन थाळी देणार असं काही शिवसैनिक म्हणत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की ते सगळं सोडून द्या. तुमचे जे दोन शिवसैनिक वाझे आणि प्रदीप शर्मा आतमध्ये आहेत. त्यांना भत्ता मिळेल की नाही याची तुम्ही काळजी करा. प्रदीप शर्मा हे पूर्वीपासूनच रडारवर होते. त्यांच्यावर पाळत होती, त्यामुळे त्यांना काल अटक झाली. हे दोन्ही PI दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे वरून आशीर्वाद मिळाल्याशिवाय ते यातलं काहीच करू शकत नाहीत.

Also Read: पहाटेच्या सुमारास ठाण्यात कोसळला इमारतीचा भाग

“आमचे प्रमुख नेते कधीच या तारखेला हे सरकार पडेल असे बोलले नाहीत. पण मी आता सांगतो की कुठल्याही क्षणी सरकार पडेल, पण आम्ही ते पाडण्याचे पाप करणार नाही. कोरोना काळात केंद्राने राज्यांना सर्व दिले, मोदीजी यांच्या विरोधात देशभर वातावरण तयार केले जात आहे. लसीसाठी ग्लोबल टेंडर का काढलं?, त्यासाठी माणसं का आली नाहीत?, केवळ केंद्रालाच टार्गेट का करण्यात आलं या साऱ्याचं महाविकास आघाडी सरकारने उत्तर द्यावे”, असंही दरेकर म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here