सातारा : राज्यात मान्सूनच्या (Monsoon) जोरदार आगमनानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून याचा फटका अनेक जिल्ह्यांसह गावांना बसला आहे. अशातच आता सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा या जिल्ह्यांत येत्या तीन-चार तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Satara Pune Kolhapur Sangli Raigad Sindhudurg District Will Receive Heavy Rain In Next Three Hours)
राज्यात मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून साताऱ्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेतात पाणीच-पाणी झाल्यामुळे टोमॅटो (Tomato), वांगी, भेंडी, बावची यांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात (Farm) मोठ्या प्रमाणात पाणी जावून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा पुणे गोवा पुढच्या 3, ४ तासात मुसळधार पावसाची शक्यता उपग्रह चित्रामध्ये दिसत आहे pic.twitter.com/99cCw6Gfey
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 18, 2021
सध्या राज्यात धुवांधार पाऊस कोसळत असून नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागली आहेत, तर धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होताना दिसत आहे. दरम्यान सातारा, पुणे, कोल्हापूर सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा या जिल्ह्यांत येत्या तीन-चार तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामानने वर्तवल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. शिवाय हवामानने नदीकाठच्या गावांनाही सर्तकतेचा इशारा दिला असून घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या बहुतांश ठिकाणी पावसाचे (Rain) प्रमाण कमी-अधिक असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची (Kharif Sowing) घाई न करता जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा झाल्यानंतर वापसा लक्षात घेऊन पेरणी करावी, असे आवाहन आवाहन कृषी विभागाने (Department of Agriculture) केले आहे.
Satara Pune Kolhapur Sangli Raigad Sindhudurg District Will Receive Heavy Rain In Next Three Hours
Esakal