कोपर्डे हवेली (सातारा) : बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेतात पाणीच-पाणी झाल्यामुळे टोमॅटोसह (Tomato) इतर पिकांचे कोपर्डे हवेली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील शेतात (Farm) मोठ्या प्रमाणात पाणी जावून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी (Farmer) पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. (Major Damage To Tomato Crop Due To Heavy Rain In Koparde Haveli Area Satara Agricultural News)
गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी जावून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्यात चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) पिकांना फटका बसला असतानाच आता शेतकऱ्यांपुढे पावसाचे संकट उभे राहिले आहे. बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गुरूवारी उघडझाप सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. गुरुवारी परिसरात टोमॅटो पिकांचे तोडे सोडून शेतीतील सर्व कामे बंद होती.
Also Read: नदीकाठच्या ग्रामस्थांनाे सावधान! कोयना धरणातून पाणी साेडले

कराड-मसूर रस्त्यावरील पूर्वेच्या बाजूला पाणी साचून राहिल्याने शिवार जलमय झाला आहे. हा पाऊस पेरणी झालेल्या पिकाला पूरक मानला जात असला, तरी माळव्याच्या पिकाला हानीकारक आहे. माळव्याच्या पिकांत साचलेले पाणी शेतकरी शेतातून काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सुखावले असले, तरी शेतात पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे वर्षभरात मेहनतीने पिकवलेले पीक या मुसळधार पावसामुळे वाया जाणार आहे.
Major Damage To Tomato Crop Due To Heavy Rain In Koparde Haveli Area Satara Agricultural News
Esakal