नारायणगाव – येथील पुणे नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) जांबुत फाटा येथे दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारकारची (Motorcar) मागून धडक बसून झालेल्या अपघातात (Accident) भटकळवाडी (ता. जुन्नर) येथील पती, पत्नीसह त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. (Pune Nashik Highway Three Death in Accident)

अपघातात राजेश निवृत्ती लेंडे (वय ३०), त्यांची पत्नी सुरेखा (वय २७), मुलगा यश यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोटारकार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पुतणीचा विवाह असल्याने राजेश लेंडे हे पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना नारायणगाव येथे कपडे खरेदीसाठी घेऊन गेले होते. परत येत असताना पुणे नाशिक महामार्गावर जांबुत फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने (एमएच १४ जीएच २२०६) मागून धडक दिली. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे भटकळवाडी गावावर शोककळा कोसळली. अपघात नंतर मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here