सातारा : महाराष्ट्र राज्याचे मिनी काश्मीर (Mini Kashmir) आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीतील (Mahabaleshwar-Panchgani) पर्यटनस्थळे (Tourist places) उद्या (ता. १९) शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र, येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर चेक नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन तपासणी केली जाणार, तसेच हॉटेल व्यावसायिक कर्मचाऱ्यांची प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना महाबळेश्वर-पाचगणीत एन्ट्री दिली जाणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले (Sangeeta Rajapurkar-Chowgule) यांनी दिली. (Mahabaleshwar Panchgani Will Be Open For Tourists From Tomorrow Satara Marathi News)
महाराष्ट्र राज्याचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीतील पर्यटनस्थळे उद्या शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील (Tehsildar Sushma Chaudhary-Patil), माजी नगराध्यक्ष डी. एम बावळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन नियमांत शिथिलता देत काही निर्बंध उठविले. त्यामुळे शनिवार 19 जूनपासून महाबळेश्वर आणि पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र, येथे येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली असून त्याशिवाय येथे प्रवेश दिला जाणार नसल्याचे बैठक नमूद करण्यात आले आहे.
Also Read: Video पाहा : कास तलाव भरला; पर्यटकांना वजराई धबधब्याचे आकर्षण

दरम्यान, कोरोना चाचणीच्या अहवालाबरोबर पर्यटकांची पांचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह असतील, अशाच पर्यटकांना महाबळेश्वर, पांचगणीत प्रवेश देण्यात येणार आहे. शिवाय बाजार पेठेतील दुकानदारांना देखील कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. व्यापारी व हॉटेलमधील कामगारांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना काही अशी दिलासा मिळाला आहे.
Mahabaleshwar Panchgani Will Be Open For Tourists From Tomorrow Satara Marathi News
Esakal