आपल्या सिनेमासृष्टीत अभिनेत्यांचे अनेक किस्से विविध कारणांनी प्रसिद्ध आहेत. कधी कोणासोबत वाद, तर कधी चित्रपटाच्या सेटवरच एखाद्या हिरोचं प्रेमप्रकरण; पण आज आपण ‘वाद’ किंवा ‘प्रेम’ याबद्दल बोलणार नाही आहोत. आज आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, ज्याचा ‘गदर : एक प्रेमकथा’ (Gadar Ek Prem Katha Film) हा चित्रपट 20 वर्षांपूर्वी सुपरहिट ठरला होता. तुम्हाला त्याचं नाव समजलच असेल! होय, आम्ही अभिनेता सनी देओलबद्दल (Sunny Deol) बोलत आहोत. ‘जिनका ढाई किलो का हाथ किसी पर पड़ता है, तो वो आदमी उठता नहीं उठ जाता है।’ अशा अनेक फेमस संवादांनी हा चित्रपट ‘हिट’ ठरला. पण, तुम्हाला हे माहिती आहे, की बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनी त्याच्यासोबत कधीकाळी काम करण्यास नकार दिला होता. सनी देओल यांनी चित्रपटसृष्टीतील जवळ-जवळ सर्व अभिनेत्रींसोबत चित्रपट केले; पण त्यातील काही अभिनेत्रींनी त्याच्या सोबत काम करण्यास साफ नकार दिला होता. त्यांनी त्यावेळी वेगवेगळी कारणं सांगितली होती. (Bollywood These Actress Refused To Work With Sunny Deol For This Reason Sridevi Aishwarya Rai Kajol Madhuri)

आपल्या सिनेमासृष्टीत अभिनेत्यांचे अनेक किस्से विविध कारणांनी प्रसिद्ध आहेत. कधी कोणासोबत वाद, तर कधी चित्रपटाच्या सेटवरच एखाद्या हिरोचं प्रेमप्रकरण; पण आज आपण ‘वाद’ किंवा ‘प्रेम’ याबद्दल बोलणार नाही आहोत.

सनी देओलने आपल्या करिअरची सुरूवात 1984 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटानं केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता सिंह झळकली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत सनीला पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळवून दिला होता. 90 च्या दशकात त्यानं डर, घातक, इंडियन, दामिनी, ज़िद्दी, बॉर्डर, फर्ज़ या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपट केले. सनी देओलचा अखेरचा चित्रपट ‘ब्लॅंक’ 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सनीनं चित्रपटांपासून दूर राहून राजकारणात प्रवेश केला. सध्या सनी भाजपमध्ये असून आपली राजकीय सफर चांगल्या पध्दतीनं पार पडत आहे.

Actress Kajol

काजोल (Actress Kajol) : या अभिनेत्रीनं काही कारणास्तव सनी देओलसोबत काम करण्यास नकार दिला. स्वत: दिग्दर्शक अनिल शर्मा (Director Anil Sharma) यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की काजोलनं आपल्या ‘गदर’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ते पुढे सांगतात, काही लोकांना असं वाटतं की, आपण त्याच्याबरोबर काम करण्यास पात्र नाही. तर काहींना असं वाटतं होतं की, आपण त्याच्यापेक्षा लहान आहोत आणि ते मोठे, त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. तसेच काहींना त्याचे चित्रपट आधुनिक वाटत होते. पण, कदाचित परमेश्वरालासुद्धा असे वाटले असावे, म्हणून हा चित्रपट केवळ अमिषालाच (Amisha Patel) मिळाला.

Actress Sridevi

श्रीदेवी (Actress Sridevi) : बॉलिवूडची ‘चांदणी’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीबद्दल असं बोललं जातं, की ही अभिनेत्री अशी भूमिका निवडायची, ज्यामध्ये तिच्या भूमिकेला नायकापेक्षा अधिक महत्व असायचं. श्रीदेवीनेही सनी देओलसोबत काम करण्यास नकार दिला होता. याचा उल्लेख खुद्द सनी देओलनं केला. ‘घायल’ या चित्रपटासाठी मी श्रीदेवीकडे संपर्क साधला होता, पण तिनं चित्रपट करण्यास नकार दिला, असं त्यानं सांगितलं. दरम्यान, श्रीदेवी आणि सनी देओलनं चालबाज, निगाहें आणि राम अवतार या चित्रपटात काम केलं. या सर्व चित्रपटांमध्ये श्रीदेवीची भूमिका सनी देओलच्या भूमिकेपेक्षा मोठी होती.

Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) : जगभरात आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ऐश्वर्या रायनं देखील सनीसोबत काम करण्यास नकार दिला होता. सनी देओलच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्याकडं अधिक लक्ष दिलं जातं, असं तिचं म्हणणं होतं. यामुळे ऐश्वर्यानं त्याच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला. मात्र, नंतर ऐश्वर्यानं सनीसोबत ‘शहीद’ चित्रपटात काम केलं होतं.

Madhuri Dixit

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) : बॉलिवूडची धक्-धक् गर्ल माधुरी दीक्षितनं 90 च्या दशकात जवळपास प्रत्येक अभिनेत्याबरोबर काम केलं आहे. त्यावेळी प्रत्येक अभिनेत्यानंही माधुरीसोबत काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. माधुरी दीक्षितनं अभिनेता सनी देओलसोबत ‘त्रिदेव’ चित्रपटात काम केलं आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, पण त्यानंतरही माधुरीनं कधीही सनीसोबत कोणत्याही चित्रपटात काम केलं नव्हतं. तिचं म्हणणं असं होतं, की सनी फक्त अ‍ॅक्शन चित्रपट करतो, त्यामुळे तिनं त्याच्यासोबत कोणताही चित्रपट करायचा नाही, असं ठरवलं. पण, असंही म्हटलं जातं, की सनी देओलच्या रागामुळे काही अभिनेत्रींनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

Bollywood These Actress Refused To Work With Sunny Deol For This Reason Sridevi Aishwarya Rai Kajol Madhuri

Esakal

3 COMMENTS

  1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. nicely but thank god, I had no issues. for instance the received item in a timely matter, they are in new condition. blue jays so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap jordan shoes https://www.realjordansshoes.com/

  2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or a but thank god, I had no issues. since the received item in a timely matter, they are in new condition. in any event so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap louis vuitton bags https://www.louisvuittonsoutlet.com/

  3. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. nor but thank god, I had no issues. the same as the received item in a timely matter, they are in new condition. direction so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap jordans for sale https://www.cheapjordanssneakers.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here