Indian Railways/IRCTC Latest News : कोरोना महामारीचं संकट आटोक्यात आल्यानंतर देशात निर्बंध कमी करण्यात येत आहेत. देश अनलॉक होत असताना हळूहळू जनजीवन पुर्वरत होतेय. सार्वजनिक सुविधा सुरु होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर रेल्वेनेही महत्वाचा निर्णय घेतला आहे. 21 जून, योग दिनामिमित्त 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार आहे. लोकांच्या आग्राहानंतर रेल्वे मंत्रालयानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 25 जूनपासून गोरखपूर (उत्तर प्रदेश) ते बांद्रा अशी नवीन ट्रेन सुरु होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. शताब्दी, दुरंतो आणि अनेक स्पेशल ट्रेन 21 जूनपासून सुरु होणार आहेत.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या आठवड्यात स्पेशल ट्रेन सुरु होणार असल्याची माहिती दिली होती. bit.ly/RestoredTrains या संकेतस्थळावर रेल्वेसंदर्भातील आणखी माहिती मिळेल. कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या रेल्वे धावण्यासाठी आता पुन्हा सज्ज झाल्या आहेत. नव्यानं सुरु होणाऱ्या रल्वेमध्ये अनेक एक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रेल्वेकडून जारी केलेल्या यादीनुसार, नवी दिल्ली-कालका शताब्दी, नवी दिल्ली-देहराडून शताब्दी, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी, दिल्ली सराय रोहिल्ला-जम्मू तवी दुरंतो, माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली श्री शक्ती एक्स्प्रेस आणि लखनऊ-प्रयागराज संगम एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. पाहा संपूर्ण यादी…

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जवळपास 800 मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे सुरु झाल्या होत्या. शुक्रवारी ही संख्या 983 वर पोहचली आहे. कोरोना महामारीच्या काळात रेल्वेनं अनेक स्पेशल ट्रेन्स सुरु केल्या होत्या. रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतची सोशल मीडियावर वारंवार माहिती देण्यात येत होती. आता पुढील काही दिवसांत रेल्वे मंत्रालयाकडून अनेक रेल्वे पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत.
Esakal