जळगाव ः वर्षभर कोविड (covid-19) महामारीबाबत उपाययोजना करून अधिकाधिक रुग्णांना कोरोनापासून (corona) वाचविण्यासाठी धडपड होती. तिसरी लाट ( corona third wave)अजून तरी आलेली नाही, तिसरी लाट आली, तर त्यातही रुग्णावर लवकरात लवकर उपचार कसे होऊन तो वाचेल अशा पद्धतीने कार्यपद्धती तयार करीत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त (corona free village) राहण्यासाठी ग्राम कोरोनाविरोधी स्वयंसेवक दल तयार करू, महसूल विभागाचे ‘माझी वसुंधरा’, ‘महाराजस्व’ अभियान यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिली. (defeat crona establishment of swayamsevak forse forces villages )

Also Read: नव्या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात

जिल्हाधिकारी राऊत यांना जळगाव जिल्हाधिकारी पदाची सूत्रे घेऊन शुक्रवारी (ता. १८) वर्ष झाले. त्यानिमित्त ते ‘सकाळ’शी संवाद साधत होते. ते म्हणाले, की कोरोना महामारीच्या तिसरी लाटेला थोपविण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ‘ट्रिपल टी’ सूत्रावर भर असेल. रुग्णांना ऑक्सिजन बेडची कमतरता पडणार नाही, रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असेल, यासाठी आराखडा तयार करणे सुरू आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटीकरणावर भर दिला जात आहे.

Collector Abhijit Raut

कोरोना गावपातळीवर रोखणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ६५ गावांनी कोरोनाला गावात येण्यापासून रोखले आहे. आगामी लाटेतही सर्वच गावांत कोरोना संसर्ग येऊ नये, यासाठी ॲक्शन प्लॅन तयार आहे. त्यात एनएसएस, एनसीसीच्या व नागरिकांच्या मदतीने ग्राम कोरोनाविरोधी स्वयंसेवक दल तयार करणार आहे. एक हजार लोकसंख्येचे घटक करून त्यांच्या कोरोनाबाबत व उपाययोजनांबाबत जनजागृती, सर्वेक्षण, टेस्टिंग सुविधा करण्यात येतील. प्रत्येक गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे, यासाठी नियोजन सुरू आहे.

Also Read: जळगाव जिल्‍हा रुग्णालयाचा ‘फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्‍मान

शैक्षणिक मूल्यवर्धन
शाळांबाबत भौतिक व शैक्षणिक मूल्यवर्धन कसे होईल, यावर भर राहील. शासकीय सेवा सुरळीतपणे देणे, शासनाचे विविध कार्यक्रम जसे ‘माझी वसुंधरा’, ‘महाराजस्व’ अभियान यांची प्रभावी अंमलबजावणी करू. कोरोनामुळे विस्कळित झालेले नियमित शासकीय कामकाज पुन्हा रुळावर आणणे हे ध्येय असेल.

वर्षभरातील कामगिरी…
* मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात जाऊन अचानक तपासणी
* बेड साइड असिस्टंट योजना राज्यात प्रथम राबविली
* लोकसहभागाचा यशस्वी पॅटर्न
* मल्टिसुपर स्पेशालिटी दर्जाची उपचारपद्धती
* रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काळ्या बाजारावर नियंत्रण
* मोहाडी येथे ९०० बेडच्या हॉस्पिटलची उभारणी
* बेड मॅनेजमेंट सिस्टिमची यशस्वी अंमलबजावणी
* ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी
* ‘फोर वे’च्या कामांकडे बारकाईने लक्ष
* ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात बाजी
* उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here