जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (BHR Credit Union) अवसायकाच्या कार्यकाळातील कोटींच्या गैरव्यवहारात (Scam) दुसऱ्या टप्प्यातील कारवाईत व्यावसायिक, उद्योजक (Businessman) , राजकीय कार्यकर्त्यांसह (Political) १२ जणांच्या अटकेनंतर (Arrest) आता जिल्ह्यातील एका आमदाराचे (MLA)आर्थिक व्यवहार रडारवर असून, आमदाराच्या नावे वॉरंट (Arrest Warrant) निघाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. ( bhr scam case doubts over financial transactions of mla)

Also Read: कोरोनाला हरविण्यासाठी गावागावांत ‘स्वयंसेवक’ दलाची स्थापना!

दरम्यान, गुरुवारी अटक केलेल्या हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, डाळ उद्योजक प्रेम कोगटा यांच्यासह १२ जणांना गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
बीएचआर पतसंस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण थंड होत नाही तोच अवसायक नियुक्तीनंतरच्या काळातही त्यापेक्षा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून पुणे डेक्कन पोलिसांत याबाबत गुन्हे दाखल आहेत. आधीच्या टप्प्यात सीए, ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष, मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा मुलगा यांना अटक झाली होती. आता नंतरच्या टप्प्यात १२ जणांना गुरुवारी अटक झाली.

आमदारांचे व्यवहार रडारवर
पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी जळगावात दाखल झाले, तेव्हा या पथकाकडे जिल्ह्यातील एका आमदाराने केलेले आर्थिक व्यवहार डोळ्यासमोर होते. आमदाराला ताब्यात घेण्यासाठी वॉरंटही पथकाकडे असल्याचे वृत्त आहे. मात्र, या कारवाईत माशी कुठे शिंकली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Also Read: जळगाव-औरंगाबाद महामार्गासाठी शेगाव, बारामतीहून वाळू; कामात १८४ ब्रास अवैध वाळू

सर्वांना २२ पर्यंत कोठडी
या प्रकरणी आधीच्या टप्प्यातील अटक सत्रानंतर गुरुवारी १२ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी अंबादास मानकापे (औरंगाबाद), प्रेम नारायण कोगटा व जयश्री तोतला यांना गुरुवारीच न्यायालयात हजर केले असता २२ तारखेपर्यंत कोठडी सुनावली. उर्वरित संशयित भागवत भंगाळे, छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, आसिफ तेली, जयश्री मनियार, संजय तोतला, राजेश लोढा, प्रमोद कापसे व प्रीतेश जैन यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here