नवी दिल्ली – कोरोनाच्या उद्रेकामुळे दक्षिण चीनमधील बंदरातून होणारी वाहतूक आठवड्याभरापूर्वी ठप्प झाली होती. यामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत होऊन माल पोहोचण्याच्या प्रक्रियेला काही महिने लागू शकतील. याचा परिणाम जगभरात पुरवठा केला जाणारा माल उशिराने पोहोचेल. त्याचा वाहतूक खर्च वाढेल आणि यामुळे बाजारात ग्राहकांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. ही मालवाहतूक जितका वेळ पुर्ण क्षमतेनं सुरु होण्यास लागेल तोपर्यंत मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात होणाऱ्या मोठ्या सण, उत्सवात केल्या जाणाऱ्या खरेदीवर याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात दक्षिण चीनमध्ये जगातील सर्वाधिक वाहतूक होणाऱ्या बंदरापैकी एक असलेल्या ग्वांगडोंगमध्ये सर्व वाहतूक बंद केली होती. तसंच लॉकडाऊनही करण्यात आलं होतं. कोरोनाला रोखण्यासाठी किनाऱ्यावरील सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

ग्वांगडोंगमध्ये कोरोना आटोक्यात आल्यानंतर काही निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र यामुळे खूप मोठं नुसकान झालं आहे. हाँगकाँगपासून 50 मैलांवर असलेल्या यातियान पोर्टवरून दर दिवशी 20 फूटांचे 36 हजार वाहून नेले जातात. मात्र कोरोनामुळे ही वाहतूक गेल्या महिन्यात आठवड्याभरासाठी बंद होती. डॉकमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेतला होता. आताही वाहतूक सुरू केली असली तरी पुर्ण क्षमतेनं कामकाज सुरू नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर कंटेनर आणि जहाजे ये-जा करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

Also Read: लॉकडाउनमध्येही लाखो जणांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

ग्वांगडोंगमधील शेकोऊ, चिवान, ननशा पोर्टमधील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. यामुळे जगातील जहाजातून होणाऱ्या मालवाहतुकीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाल्याचं दिसतं. जहाज मालकांची संघटना असलेल्या Bimco चे मुख्य शिपिंग अॅनालिस्ट पीटर सँड यांनी म्हटलं की, यानतियानमधील बॅकलॉग हा आधीच जागतिक पुरवठ्यावर असलेल्या दबावात वाढ करणारा आहे. वर्षा अखेरीस जेव्हा ख्रिसमसला लोक खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा त्यांना हव्या त्या गोष्टी खरेदी करताना ते मिळेलच असं नाही.

सुएझ घटनेनं झालेल्या नुकसानीएवढाच फटका

जवळपास 50 कंटेनर वाहतूक करणारी जहाजे ग्वांगडोंगच्या बाहेर डेल्टा नदीत उभा राहिली. 2019 नंतर हे सर्वात मोठं बॅकलॉग आहे. तसंच मे महिन्यापासून बंदरात 3 लाख 57 हजार कंटेनर लोड वाहतूक होऊ शकली नाही. सुएझ कालवा 6 दिवस बंद झाल्यानं जितकं नुकसान झालं तेवढं आतापर्यंत मे महिन्यापासून झालं आहे. नेहमीच्या तुलनेत 70 टक्क्यांपर्यंत यानतियान बंदरातील वाहतूक सामान्य करण्यात आली आहे. पण जून अखेरपर्यंत सर्व पुर्ववत होण्याची शक्यता कमी आहे.

Also Read: जगातील सर्वांधिक मान्यताप्राप्त नेते मोदीच! बायडन यांनाही टाकलं मागे

वाहतुकीस उशिर आणि खर्चात वाढ

जहाज वाहतुकीवर झालेल्या या परिणामामुळे अनेक कंपन्यांना भुर्दंड बसला. त्यामुळे जहाज कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना माल पोहोचण्यासाठी उशिर होईल हे कळवलं. तसंच मार्ग बदलावा लागल्यानं वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाली. जहाजे पोहोचण्यासाठी 15 दिवसांपेक्षा जास्त उशिर झाला. तसंच इतर मार्गाने जाताना तिथल्या वाहतुकीवरही ताण आल्यानं त्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागली. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक खर्च वाढला. उदाहरणादाखल सांगायचे तर आशिया ते नॉर्थ अमेरिका वाहतूक करणाऱ्या प्रत्येक 45 फूट कंटेनरसाठी 3 हजार 798 डॉलर इतके शुल्क आकारले गेले. पूर्व पश्चिम मार्गावरील आठ मोठ्या मार्गांवरील दर गेल्या वर्षभरात वाढले असल्याची माहिती लंडनस्थित ड्र्यूरी शिपिंगने दिली आहे. शांघाय ते रॉटरडॅम दरम्यान वाहतुकीचे दर 534 टक्के वाढले आहेत. 40 फूट कंटेनरसाठी ते 11 हजार डॉलर इतके शुल्क आकारले गेले. इतकेच दर चीन ते युरोप वाहतुकीसाठीही घेतले गेले. 2017 पासून हे दर सर्वाधिक ठरले.

Also Read: कोरोना काळातही भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ

जगभरात बाजारपेठांमध्ये वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता

ग्वांगडोंगमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीचा परिणाम म्हणजे जगातल्या उद्योग व्यवसायावर ताण वाढत आहे. आशियातील उद्योगासाठी प्रवेशद्वार असलेल्या बंदरात निर्माण झालेल्या या परिस्थितीने अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनारपट्टीवर प्रमुख बंदरात कंटेनर आधीच अडकले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल रिटेल फेडरेशनने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनाही या परिस्थितीची माहिती दिली आहे. पुरवठा करण्यासाठीचा वेळ वाढतोय असं नाही तर यामुळे अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि ग्राहकांना सेवा पुरवण्यावरही याचा परिणाम दिसेल असा इशाराही फेडरेशनने दिला आहे. जगातील सप्लाय चेन ही किती कमकुवत किंवा लहान आहे हे या गौंगडाँगमधील परिस्थितीने निदर्शनास आणून दिलं आहे असं टेक्सासमधील E2open चे कार्यकारी उपाध्यक्ष पवन जोशींनी म्हटलं आहे. त्रुटी किंवा अनपेक्षित याला आता काही अर्थ नाही. तुम्ही एकही चूक करू शकत नाही कारण आता फार काळ बफर नाही.

मागणी वाढली पण पुरवठ्यात अडथळा

कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगाला मोठा फटका बसला आहे. आता अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होत आहे. कंपन्यांकडून उत्पादनात वाढ केली जात आहे आणि ग्राहकांची मागणीही वाढत आहे. पण हे होत असताना कंटेनर वाहतुकीच्या साधनांमध्ये मात्र वाढ झालेली नाही. अनेक देशांनी कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे लोक आता बाहेर पडत असून बाजारपेठांमध्ये ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. दुसऱ्या बाजुला मात्र जागतिक बाजारपेठेत पुरवठा करणाऱ्या साखळीमध्ये अडथळा आला आहे. ती पुर्ववत करण्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. पुर्ण क्षमतेनं हे सुरु होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागेल असं Bimco च्या पीटर यांनी म्हटलं आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here