देशासाठी प्रेरणास्त्रोत असलेले भारताचे माजी धावपटू ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन झाले. मिल्खा सिंग हे 91 वर्षांचे होते. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोला फरहानने कॅप्शन दिले, ‘प्रिय मिल्खाजी, तुम्ही या जगात नाहीत हे स्विकारण्यासाठी अजूनही माझं मन तयार नाही. कदाचित, तुमच्याकडून मला मिळालेली ही ती एक जिद्द न सोडण्याची बाजू म्हणता येईल. कधीही हार न मानण्याची बाजू…आणि सत्य हे आहे की तुम्ही आमच्यात कायम जीवंत राहाल. कारण तुम्ही खूप प्रेमळ, मोठ्या मनाचे आणि दयाळू व्यक्ती होता. तुम्ही तुमच्या कल्पना, तुमचं स्वप्न साकारलं. मेहनत, प्रामिणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणंही शक्य असल्याचं तुम्ही दाखवून दिलं.’अभिनेत्री प्रियांका चोपडाने ट्विट करून मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे, तिने ट्विट केले,’प्रेमाने स्वागत करत तुम्ही आपली पहिली भेट अगदी खास केली होती.आपल्या देशासाठी केलेल्या योगदानामुळे, तुमच्या कर्तृत्वामुळे आणि विनम्रतेमुळे मी प्रेरित झाले आहे. ओम शांती मिल्खा जी’ अभिनेता अनिल कपूर यांनी मिल्खा सिंग यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनिल यांनी मिल्खा सिंग यांच्यासोबतची आठवण शेअर करत ट्विट केले, ‘मिल्खा सिंगजी यांनी आमचे स्वागत केले होते. त्यांच्या पत्नीने आम्हाला पराठे खाऊ घातले, ते महान खेळाडू होते.’अभिनेता अक्षय कुमारने मिल्खा सिंग यांच्याबद्दल ट्विट केले, ‘मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झालं. त्यांची भूमिका न साकारल्याचं दु:ख मला कायम लक्षात राहिल. तुम्ही स्वर्गात सुवर्ण धाव घ्या.. ‘फ्लाईंग सिख’,ओम शांती.’