जळगाव : उन्हं, वारा, वादळ, पाऊस, थंडी अंगावर घेत चार-साडेचार हजार किलोमीटरच्या पदयात्रेला (Walking) निघालेला हा पन्नाशीतील तरुण. घरातील आजारपणामुळे ज्या कुटुंबांवर आर्थिक, मानसिक संकट (crisis) कोसळते. त्यांना मदतीचा हात देण्याची व्यवस्था प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्यात उभी करण्याचा उद्देश घेऊन गावोगाव फिरतोय, महाराष्ट्राचे (Maharashtra) आरोग्य सुधारण्यासाठी. (man walked four thousand kilometers for the health of maharashtra)

Also Read: बीएचआर प्रकरण: आमदारांचे आर्थिक व्यवहार रडारवर!

घनश्‍याम केळकर असे या व्यक्तीचे नाव. गेल्या वर्षी १७ ऑक्टोबरला रायगड किल्ल्यावरून त्यांचा प्रवास सुरू झाला. रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतून दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त पायी प्रवास करत कुऱ्हामार्गे शनिवारी (ता. १९) जळगावला पोचणार आहेत. नंतर धुळे, नंदुरबार असा प्रवास करून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किल्ले शिवनेरीवर या यात्रेचा समारोप होईल, असे श्री. केळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

walked

ठिकठिकाणी प्रतिसाद
ज्या गावात श्री. केळकर जातात, त्याठिकाणी परिचित, मित्रपरिवार तसेच माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींशी संपर्क करतात. रुग्णांच्या उपचार व मदतीची व्यवस्था उभी राहावी, म्हणून जनजागृती करतात. यासाठी www.aarogyadaan.org या वेबसाइटच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात येत आहे. याचबरोबर राज्यातील सर्व कुटुंबांना आरोग्य विमा सरकारमार्फत दिला जावा, यासाठीही ते जनजागृती करीत असून, त्यांना ठिकठिकाणी प्रतिसादही मिळतोय.

Also Read: कोरोनाला हरविण्यासाठी गावागावांत ‘स्वयंसेवक’ दलाची स्थापना!

जळगावकरांना आवाहन
जळगावला आरोग्यदान उपक्रम सुरू करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. घनश्याम केळकर १९ ते २१ जूनदरम्यान जळगावला असणार आहेत. हा उपक्रम आपल्या गावात, जिल्ह्यात सुरू करण्यासाठी उत्साही, सामाजिक कामाची आवड असणाऱ्या लोकांची गरज आहे. या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. केळकर यांनी केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here