कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona virus) सध्या जगभरातील लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर सुरु केले आहे. पण दुसरीकडेच काहीजण या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसतात, तेअशा पदार्थांचे सेवन करतात ज्यामुळे त्यांची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि ते पदार्थ लवकरात लवकर थांबविले नाही…तर भविष्यात आरोग्याशी निगडीत मोठ्या आजारांचा सामना करावा लागेल. (avoid-food-immunity-system-affects-lifestyle-news)

अतिगोड पदार्थांचे सेवन
ज्यांना मधुमेहाचा आजार आहे तसेच अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्ले तर शरीरात जास्त साखर निर्माण झाल्यास ब्लड शुगर खूप वाढू शकते. अभ्यासानुसार हाय ब्लड शुगर लेव्हल आतड्यांची कार्यक्षमता बिघडवू शकते यामुळे शरीरात मोठा बदल होऊन विविध आजार होऊ शकतात. म्हणून कमी गोड खा आणि निरोगी राहा.

हाय फॅट फूड
ज्या खाद्यपदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते ते रोगप्रतिकारक शक्ती आणि पांढऱ्या पेशींच्या कार्याला संथ करून संक्रमणाला चालना देऊ शकतात. Microbiome नावाच्या एका जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार हाय फॅट फूड आतड्यांच्या बॅक्टेरिया मध्ये बदल आणि आतड्यांच्या खोलाशी जाऊन नुकसान पोहचवू शकतात. म्हणूनच अशा प्रकारच्या आहारापासून दूर राहायला हवे.

मीठ
मिठाच्या अतिसेवनामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य असंतुलित होऊ शकते आणि आतड्यातील बॅक्टेरिया बदलू शकतात. याच कारणामुळे डॉक्टर सुद्धा आहारात जास्त मीठ न वापरण्याचा सल्ला देतात. चिप्स, फ्रोजन डिनर आणि फास्ट फूड सारखे जास्त मीठ असणारे पदार्थ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते

ओमेगा 6 फॅट युक्त आहार
जाणकारांच्या मते जास्त ओमेगा 3 फॅट युक्त आहार खावा आणि ओमेगा 6 फॅटयुक्त आहार कमी खावा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जास्त सुधारेल. तसेच जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती अधिक कमकुवत करायची नसेल तर मीठ, साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा.
Esakal