बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईमध्ये जलसा, प्रतीक्षा आणि जनक हे बंगले आहेत. त्यामधील जलसा नावाच्या बंगल्यात बिग बी कुटुंबासोबत राहतात. एका रिपोर्टनुसार जलसाची किंमत 100 ते 120 कोटी आहे. जलसाचा अर्थ सेलिब्रेशन असा आहे.प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी जलसा हा बंगला अमिताभ यांना 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाचा मोबदला म्हणून भेट दिला होता. त्यानंतर अमिताभ यांनी हा बंगला त्यांच्याकडून विकत घेतला. जेव्हा अमिताभ बच्चन यांनी 80 च्या दशकाच्या सुरुवातीला जलसा विकत घेतला तेव्हा त्या घराचे नाव ‘मानसा’ म्हणजे ‘सम्राट’असे होते.ज्योतिषाच्या सांगण्यावरून या बंगल्याचे नाव जलसा करण्यात आले.कोरोना महामारीच्या आधी अमिताभ बच्चन दर रविवारी जलसाच्या बाहेर त्यांच्या चाहत्यांना भेट देण्यासाठी येत असत.चूपके चुपके, आनंद, सत्ते पे सत्ता आणि नमक हराम या चित्रपटांचे शूटिंग जलसा बंगल्याच्या आवारात झाले आहे.