-सोमनाथ तवार
औरंगाबाद: पैठण तालुक्यातील खादगांवसह अनेक गावांसाठी महत्वाचा समजला जाणारा सोनवाडी ते पारूंडी या मुख्य रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे बंद आहे. या रस्त्याचे काम तिरूपती कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या कंपनीकडे आहे. मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जून २०१९ मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. परंतु मध्येच हे काम बंद पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काम पुर्ण करण्याचा कालावधी मार्च २०२० पर्यंत असताना देखील आजपर्यंत या रस्त्याचे काम अपूर्णच आहे.

पावणे सात किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी जवळपास तीन कोटी बारा लाख खर्च असलेल्या या रस्त्याचे काम केवळ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे काम अपूर्णच आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. या रस्त्यावर गेल्या ३ महिन्यांपासून फक्त खडी अंथरूण ठेवली आहे. रस्त्याचे काम चालू झाल्यापासून आतापर्यंत बऱ्याच दुचाकी वाहने घसरून छोटे-मोठे अपघात झाले आहे. हा मुख्य रस्ता असल्याने नेहमी वर्दळ असते.
Also Read: दिलासादायक! जालन्यात कोरोना रुग्णसंख्या घटली
रात्री अपरात्री एखाद्या रुग्णाला गावातून शहराच्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जातांना रुग्णाच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते.रस्त्याच्या दैनिय अवस्थेमुळे गावात येणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस टी ही बंद झाली आहे.या रस्त्याचे काम लवकरात लवकर अपूर्ण असलेले काम पुर्ण करावे अशी मागणी त्रस्त ग्रामस्थांनी व प्रवाशांनी केली आहे.
या रस्त्याची चौकशी करून अपूर्ण असलेले काम पूर्ण करावे.या भागातील नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून तातडीने काम मार्गी लागले तर गैरसोय दूर होईल.
-दत्ता गोर्डे, माजी नगराध्यक्ष ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष )
Esakal