पुणे – हिंदुस्तानी अभिजात उपशास्त्रीय संगीतातील जुन्या व दुर्मीळ सांगीतिक रचना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शैला दातार (Shaila Datar) व संगीत दिग्दर्शक ऋषिकेश दातार (Rushikesh Datar) (गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे पणतू) यांनी नव्या स्वरूपात (New Format) ऑडिओ (Audio) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. जुन्या सांगीतिक रचना रसिकांसमोर याव्यात या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती शैला दातार यांनी दिली. (Old Songs New Generation Audio Format)

नवीन रचनांच्या माध्यमातून जुन्या दर्जेदार बंदिशी नवीन पिढीसमोर याव्यात म्हणून ऋषिकेश दातार यांनी काही निवडक रचना पुनःनिर्मित केल्या आहेत. त्यातील काही बंदिशी या देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांच्या वहीमधील असून, काही जुन्या पारंपरिक रचना आहेत. या मालिकेतील पहिली बंदिश ‘कृष्णमुरारी’ नवीन स्वरूपात सादर करण्यात आली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मालिकेतील द्वितीय पुष्पामध्ये ‘बिन बादल’ ही कजरी या प्रकारातील शंभर वर्षांहून अधिक जुनी असलेली पारंपरिक बंदिश रचना आहे. यात शैला दातार यांच्या प्रगल्भ गायकीचे सादरीकरण आहे. स्वरराज छोटा गंधर्व यांच्याकडून ही बंदिश शैला यांना मिळाली होती. या नवीन रचनेत सारंगी वादक संदीप मिश्रा, तबला वादक समीर पुणतांबेकर, बेस गिटारवर अमित गाडगीळ आदींनी साथ दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here