दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. दुसरीकडे ग्रामीणमधील रूग्णसंख्या व मृत्यूही नियंत्रणात आले आहेत.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून शनिवारी नव्याने केवळ चार रूग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी एकाही रूग्णाचा मृत्यू (Died) झालेला नाही. दुसरीकडे ग्रामीणमधील रूग्णसंख्या व मृत्यूही नियंत्रणात आले आहेत. ग्रामीण भागात शनिवारी 350 रूग्ण वाढले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मास्क (पोलिसांचा बेशिस्तांवर वॉच), सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता (सॅनिटायझरचा वापर), घरोघरी संशयितांचे टेस्टिंग अन्‌ तत्काळ उपचार (शिक्षण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान), होम आयसोलेशन बंद केल्यानेच कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. (the proportion of corona in solapur has decreased)

Also Read: दिलीप माने यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

शहरात जून महिन्यात 280 रूग्ण आढळले असून मागील 19 दिवसांत 28 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ग्रामीण भागात 1 ते 19 जून या काळात सात हजार 556 रूग्ण वाढले असून 293 जणांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनातून शहर-जिल्हा सावरू लागला आहे. सध्या शहरातील 122 तर ग्रामीणमधील दोन हजार 321 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी अक्‍कलकोट तालुक्‍यात 40, बार्शीत 37, करमाळ्यात 15, माढ्यात 33, पंढरपूर तालुक्‍यात 56, माळशिरसमध्ये सर्वाधिक 78, मंगळवेढ्यात 18, मोहोळ तालुक्‍यात 24, उत्तर सोलापुरात सहा, सांगोल्यात 37 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सहा रूग्ण आढळले आहेत.

Also Read: सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

दिलासादायक बाब म्हणजे शहरातील एकूण 26 प्रभागांपैकी प्रभाग क्र. तीन, 12, 14 आणि 15 मध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. तर उर्वरित प्रभागांमध्ये शनिवारी एकही रूग्ण आढळलेला नाही. शिक्षण, पोलिस व आरोग्य विभागाच्या प्रयत्नातून शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आले असून ग्रामीणमधील रूग्णही घटू लागल्याचे चित्र आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केल्याचे हे यश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Also Read: सोलापूर रेल्वे विभागात गेल्या दोन वर्षांत गुन्ह्यांमध्ये घट

म्युकरमायकोसिसचे 51 बळी

शहर-जिल्हा कोरोनातूर बाहेर पडू लागला असतानाच आता म्युकरमायकोसिसने प्रशासनाची चिंता वाढविली आहे. आतापर्यंत 485 रूग्ण आढळले असून त्यातील 279 रूग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर शहर-जिल्ह्यातील 32 रूग्णालयातून 155 रूग्ण उपचार घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे या आजाराने आतापर्यंत 51 रूग्णांचा बळी घेतला आहे. आज दोघांचा मृत्यू झाला असून पाच रूग्ण वाढले आहेत.

Also Read: पुणे-सोलापूर रोडवर ट्रकचा अपघात,वाहतूक खोळंबली

कोरोनाची सद्यस्थिती…

एकूण टेस्ट – 16,78,651

आतापर्यंत पॉझिटिव्ह- 1,59,960

एकूण मृत्यू- 4,318

आतापर्यंत कोरोनामुक्‍त- 1,53,199

(the proportion of corona in solapur has decreased)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here