अत्यंत साहसी स्टंट्समुळे चर्चेत असलेला ‘खतरों के खिलाडी ११’ हा रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनची उत्सुकता ताणली गेली असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. सध्याच्या सिझनमध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी असून त्यांना या शोसाठी किती मानधन मिळतंय ते जाणून घेऊयात..

गायक राहुल वैद्यला या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी १५ लाख रुपये मानधन मिळतंय.
‘ये है मोहब्बतें’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी प्रत्येक एपिसोडसाठी १० लाख रुपये मानधन स्वीकारतेय.
‘नागिन’ आणि ‘मिले जब हम तुम’ यांसारख्या मालिकांमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता अर्जुन बिजलानी प्रत्येक एपिसोडसाठी सात लाख रुपये मानधन घेतोय.
‘बालवीर’ फेम आणि या सिझनमधील सर्वांत कमी वयाची स्पर्धक अनुष्का सेन प्रत्येक एपिसोडसाठी पाच लाख रुपये मानधन स्वीकारतेय.
‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेली मॉडेल निक्की तांबोळी ‘खतरों के खिलाडी’च्या प्रत्येक एपिसोडसाठी ४.४३ लाख रुपये मानधन घेतेय.
प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री श्वेता तिवारीला प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन मिळतंय.
‘बिग बॉस’ची विजेती रुबिना दिलैकचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला याला एपिसोडप्रमाणे ४.२५ लाख रुपये मानधन मिळतंय.
अभिनेता वरुण सूदला ३.८३ लाख रुपये मिळत आहेत.
या शोचा सूत्रसंचालक रोहित शेट्टीला सर्वाधिक मानधन मिळतंय. रोहितला प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल ४९ लाख रुपये मिळत आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here