भाजपच्या अतुल भातखळकरांनी महाविकास आघाडीवर साधला निशाणा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ता शनिवारी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर तर निशाणा साधतालाच पण त्याशिवाय, आपला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ‘अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की सध्या कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिलात, तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. याच मुद्द्यावरून ‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत’, अशा शब्दात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांना टोला लगावला.

Also Read: “स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने…”; संजय राऊतांचा टोला

“एकमेकांशी लढून, गरळ ओकून, सत्तेसाठी एकत्र आलेल्यांच्या गळ्यात लोक काय हारतुरे घालणार आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधात लढले तर लोक जोड्याने मारतील…भीती खरीय. लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत. फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे”, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. त्याचसोबत, तिघाडी सरकार असा हॅशटॅगही वापरला.

Also Read: मुंबईत नव्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

“सध्या अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एकहाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील. स्वबळाचा नारा काय देता… माझ्या रोजीरोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे नारे देणाऱ्यांना सुनावलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here