२० जून रोजी जगभरात ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत शुभेच्छा देत आहेत.

मराठी अभिनेत्री मानसी नाईकने फादर्स डे निमित्त तिच्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला या फोटोला मानसीने कॅप्शन दिले, ‘स्वप्न तर माझं होतं पण ते पूर्ण करण्याचा मार्ग माझ्या वडिलांनी मला दाखवला. धन्यवाद बाबा फादर्स डे च्या शुभेच्छा’
अभिनेत्री रसिका सुनिलने तिच्या वडिलांच्यासोबतचा जून या चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला रसिकाने कॅप्शन दिले, ‘फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा’
अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करून त्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या वडिलांसोबतचा आणि मुलींसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला सिद्धार्थने कॅप्शन दिले,”बापमाणूस’.. फादर्स डे च्या शुभेच्छा पप्पा.. आणि मला पण’
सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीवने तिच्या वडिलांचे आणि तिचे फोटो असणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला सायलीने कॅप्शन दिले, ‘फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा’
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिच्या आई आणि वडिलांसोबतचा फोटो शेअर करून लिहीले, ‘फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा माझ्या आयुष्यातला बापमाणूस’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here