मालवण ( सिंधुदुर्ग) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी किल्ले सिंधुदुर्गवर जात शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी मानाचा जिरेटोप व पुष्पहार श्री. ठाकरेंच्या हस्ते छत्रपतींना अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आई भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आली.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांचे मालवणात बोर्डिंग मैदान येथे शिवसेनेच्यावतीने जल्लोषी स्वागत झाले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी बोर्डिंग मैदानालगतच्या सीताबाई श्रीपाद घुर्ये नर्सरीतील चिमुकल्या मुलांसोबत छायाचित्र काढले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीने चिमुकल्यांसह त्यांचे पालकही आनंदी झाले. त्यानंतर श्री. ठाकरे बंदर जेटीवरून आकर्षकरीत्या सजविलेल्या होडीतून किल्ले सिंधुदुर्गवर रवाना झाले.
किल्ला प्रवेशद्वारावर वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, हर्षद गावडे, शैलेश भोगले, मंदार गावडे, वायरी भुतनाथ सरपंच भाई ढोके, अन्य ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण रेवंडकर, मंगेश सावंत आदी उपस्थित होते.
सुरक्षेसाठी खबरदारी
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोर्डिंग मैदान ते फोवकांडा पिंपळ, जेटी, किल्ले सिंधुदुर्गवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पर्यटकांसाठी किल्ले दर्शन तसेच जेटीसह किल्ल्यावरील सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री किल्ले दर्शन करून माघारी परतल्यानंतर पर्यटकांसाठी किल्ले दर्शन सुविधा सुरू करण्यात आली.

News Story Feeds