मुंबई: शहराच्या नालेसफाईवरून भाजपा आणि शिवसेनेत वाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवलीत नालेसफाई योग्य रीतीने न झाल्याच्या निषेधार्थ पालिका कंत्राटदाराच्या अंगावर कचरा फेकून आंदोलन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपा कार्यकर्त्यानी मुंबईची नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या आयुक्त व महापौर यांच्या फोटोवर नाल्यातील कचरा टाकून आंदोलन छेडले. (BJP party workers thrown garbage on photos of mumbai mayor kishori pednekar iqbal singh chahal)

Also Read: प्रताप सरनाईकांच्या पत्रावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना हे चित्र उभे राहणार असल्याची नांदी यातून दिसली. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसात मुंबईचे नाले तुडुंब भरून रस्त्यावर वाहत होते. नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा आयुक्त इकबाल चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. अशात पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पावसाचे पाणी साचले. नालेसफाईच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात विरोधकाकडून टीका सुरू झाली आहे.

विद्याविहारच्या नाल्यात उतरून भाजपा कार्यकर्त्यांचे आंदोलन

Also Read: “स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने…”; संजय राऊतांचा टोला

आमदार पराग शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आज घाटकोपर पूर्व विधानसभा महामंत्री सुशील गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली विद्याविहार येथील नाल्यात उतरून भाजप कार्यकर्त्यांनी आयुक्त इकबाल चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रतिमेवर नाल्यातील कचरा टाकून आंदोलन केले. यावेळी सुशील गुप्ता यांच्यासह किशोर चव्हाण, अविनाश पोव्हल, ऋषी होगे, ड्रिकपाल सिंग, रमेश पाटील, अलोक दुबे, अजित मिश्रा हे उपस्थित होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here