नागपूर : आता खेड्यातही उद्योगाचे (Industry) वारे वाहत आहेत. हे वारे वाहत असताना यात महिला मागे नाही हे दाखविण्याचे धाडस कल्पना बंडू घोम (Kalpana Ghom) या महिलेने केले आहे. कल्पना अचलपूर तालुक्यातील कोल्हा काकडा या छोट्या खेड्यात लग्न करून आल्या. संसार सुरू झाल्यानंतर त्या फक्त चूल आणि मूल एवढ्यावरच थांबल्या नाही. काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या कल्पना बंडू घोम यांनी गावातीलच महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला महिला संघटित झाल्यानंतर कल्पना यांनी उद्योगाचे महत्त्व सांगितले. यानंतर त्यांनी बचत गटाची स्थापना (Establishment of self help group) केली. (Created-ownbusiness-by-kalpana-ghom)
सतत काही करण्याचा कल्पना यांचा प्रयत्न बचतगटातील महिलांना भावला. कल्पना घोम काही तरी करू शकतात, असा विश्वास महिलांना आला आणि एक दिवस कल्पना यांनी स्टार्टअपअंतर्गत गृहउद्योग करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या महिलांनी तो पूर्णपणे स्वीकारला. ग्रामीण भागात मोठा व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी येतात. दुसरे म्हणचे भांडलाची मोठी अडचण असते. अशा प्रसंगी गृहउद्योग करण्याचा पर्याय स्वीकारल्याचे कल्पना घोम सांगतात.
Also Read: साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? वाचा नागोबाची संपूर्ण माहिती
उन्हाळ्याच्या दिवसांत खेड्यातील प्रत्क घरात वर्षभर पुरतील इतक्या शेवया, पापड, लोणची, हळद व मिरचीपुड तयार केली जाते. त्यामुळे या ग्रामीण भागात खपणाऱ्या व्यवसायावर भर दिला. प्रथमतः पापड, लिंबू व मिरच्यांचे लोणचे तयार केले. त्याचे घरीच पॅकिंग केले. खरी समस्या आला ती मार्केटिंगची. ही गंभार समस्या कशी सोडवायची यावर मंथन झाले. शेवटी महिलांनी स्वतः मार्केटिग करावी आणि गावागावांत मालाची विक्री करावी, असा निर्णय घेतल्याचे कल्पना यांनी सांगितले.
परिसरातील दोन-चार खेड्यात विक्री केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसेंदिवस मालाला मागणी येत असल्याने व्यवसाय विस्तारिकरणाचा निर्णय घेतल्याचे कल्पना यांनी सांगितले. त्यामुळे उद्योग आणखी वाढवावा, यासाठी हालचाली सुरू झाल्यात. मुख्य अडचण होती ती भांडवल व उत्पादन विक्रीला लागणारी बाजारपेठ. कल्पना घोम यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. बचतगटाची मैत्री बचतगट या नावाने नोंदणी केली. तसेच मालाला चांगली किंमत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले.
महिलांसाठी सुरू केलेला हा व्यवसाय आता नावारूपाला आला. गावागावांमध्ये मालाची मागणी वाढू लागली आहे. कल्पना घोम या व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करू लागला. त्यामुळे त्यांच्यासमोर विस्तार कसा करायचा हा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी त्यांनी अमरावती हे शहर निवडले. परतवाडा शहरापाठोपाठ अमरावतीतही गृहोद्योगाची पायाभरणी केली. उत्पादनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी बचतगटातील सहकारी महिलांना प्रशिक्षण दिले. वेळोवेळी त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यत येत असल्याचे कल्पना घोम यांनी सांगितले.
Also Read: अन् चोरटा घुसला शौचालयात; मालकाने घेतली कडी लावून
प्रतिसादाने मिळाले बळ
आज मैत्री गृहोद्योगातून दहा ते बारा प्रकारचे पापड, लोणची तसेच शेवळ्या, हळद आणि तूरडाळ तयार केले जातात. सोबतच मूग व बरबटी वडी आदी उत्पादनेही सुरू आहेत. गावासोबतच परतवाडा शहरामध्येही गृहोद्योगाचा विस्तार केला. बचत गटातील महिलांच्या माध्यमातून उद्योग श्रीमती घोम यांनी उभा केला. ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहून कल्पना घोम यांच्यात बळ आले.

(Created-ownbusiness-by-kalpana-ghom)
Esakal