आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रविवारी (ता.२०) औरंगाबादेत सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

सायकल फेरीतील उत्कृष्ट सायकलपटूचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढून अनुक्रमे उमेश मारवाडी, अश्विनी जोशी,सोनम शर्मा या विजेत्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी ड्राॅ पद्धतीचा वापर करण्यात आला.
सायकल फेरीचे क्रांती चौकात आगमन झाले असता टिपलेले छायाचित्र.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंदार वैद्य ,जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरण सिंग संगा, सहसचिव अतुल जोशी, स्केटिंग अकॅडमी चे भिकन आंबे, योग आणि स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वाणी, क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेशचे उदय कहाळेकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
सायकल फेरीत खेळाडूंनीही सहभाग नोंदविला होता.
सायकल फेरी सहभागी चिमुरडे.
कोरोना जागतिक महामारीच्या काळात सर्वांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायाम,योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण दृष्ट्या लाभदायी असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here