जर तुम्ही काही शिल्लक राहिलेले पदार्थां पुन्हा गरम करुन खात असाल, किंवा लेफ्टओवर पदार्थांपासून कोणतीही नवी डीश तयार करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

पालक : यामध्ये उपलब्ध असलेले नायट्रेट परत गरम केल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. परिणामी नाइट्रेट आणि कैरसिनोजेन हे एकत्र होऊन तब्येत बिघडू शकते.
बटाटा : उकळून घेतलेला बटाटा बऱ्याच पदार्थांसाठी वापरला जातो. परंतु याला पुन्हा पुन्हा उकडून घेतल्यास यातील पोषक तत्वे कमी होतात. तसेच असे बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास यामध्ये बैक्टेरियाचे प्रमाण वाढून आरोग्याला साईड इफेक्ट होउ शकतात.

मांस : मांसमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनेत अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करुन खाल्ल्यामुळे तुमच्या पचन क्रीयेवर त्याचा परिणाम होतो. अशा वेळी शिल्लक मटन किंवा मासांहारी पदार्थ खायचे असल्यास सैंडविच किंवा सलादच्या स्वरुपात तुम्ही खाऊ शकता.

राईस : कच्च्या राहिलेल्या राईस किंवा भातामध्ये बैक्टेरियाचे जीवाणूंचे प्रमाण अधिक असते, असे फूड स्टॅंडर्डने सांगितले आहे. असा राईस शिजवल्यानंतरही काही जीवाणू राहून जातात. आणि अशा वेळी तुम्ही रुम टेंपरेचरवर ठेसल्यास हे जीवाणू वाढण्याचा धोका असतो. असे पदार्थ खाल्ल्यामुळे प्वॉइजनिंग होऊ शकतो. हे पदार्थ पुन्हा गरम करुन खाल्ल्यास इतर समस्याही उद्भवू शकते.
मशरुम : मशरुमची डिश तयार होईल तसे त्याचे पोषक तत्व कमी होतात. त्यामुळे यापासूनचे पदार्थ खाल्ले जातील असे सांगता येत नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here