नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे उद्यापासून (ता. २१) देशातील १८ वर्षांच्यावरील सर्वांना सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये मोफत कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनाही उद्यापासून लागू होणार आहेत. (Free vaccines for youth across the country from monday)
Also Read: खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत महागाई भत्ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जूनला जनतेशी संवाद साधताना लसीकरणाची सूत्रे केंद्र सरकारच्या हाती घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, केंद्र सरकारच आता सर्वांसाठी लस खरेदी करून ती राज्यांना मोफत देणार आहे. खासगी रुग्णालयांना बाजारातून २५ टक्के साठा खरेदी करत लसीकरण सुरु ठेवता येणार आहे. येथे शुल्क देऊन जनतेला लस घेता येईल. आतापर्यंत राज्यांना ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठीची लसच केंद्रातर्फे मोफत दिली जात होती आणि १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी राज्यांतर्फे लस खरेदी केली जात होती. आता मात्र लसखरेदीत राज्यांचा कोणताही सहभाग असणार नाही. त्यामुळे सर्वांनाच आता सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये लस मिळणार आहे.
Also Read: उद्धव ठाकरेंनी विचार केल्यास आम्हीही तयार – चंद्रकांत पाटील
लसीकरणाची वैशिष्ट्ये
– राज्यांना लोकसंख्या, कोरोनाबाधितांची संख्या आणि लसीकरणाचा वेग या आधारावर लस मिळणार
– लस वाया घालवणाऱ्या राज्यांना लसपुरवठा कमी
– थेट लसीकरण केंद्रांवर नोंदणी करून लस घेता येणार

Esakal