कुडाळ (सिंधुदूर्ग) : नेहमी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असल्याने अंधुकच दिसणार, अशी टीका शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी केली.
पालकमंत्री सामंत यांच्यावर निधी कपातीबाबत आमदार नीतेश राणे यांनी नुकताच प्रश्न उपस्थित केला होता. याला प्रत्यूत्तर श्री. बंगे यांनी दिले. ते म्हणाले, ‘या जिल्ह्याचा विकास करण्याची धमक फक्त शिवसेनेत आहे. यापुर्वी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. खासदार विनायक राऊत यांनी अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकासात्मक प्रकल्प सुरू केले. कित्येकवर्षे मोडकळीस आलेले कुडाळ व मालवण बसस्थानक नव्याने बांधुन पुर्ण केले.
जिल्ह्याचा विकास करण्याची धमक फक्त शिवसेनेत आहे.
हेही वाचा– अबब… ७४ वर्षाचा कॉलेज कुमार पाहिलात का?
कुडाळमध्ये मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे काम सुरू झाले. क्रीडांगणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, अशी किती तरी कामे आमदार नाईक यांच्या माध्यमातून पुर्णत्वास जात असताना आता एक हुशार आणि अभ्यासपूर्ण पालकमंत्री सामंत यांच्या रूपाने या जिल्ह्याला मिळाला असल्याने माजी पालकमंत्री केसरकर यांनी सुरू केलेले महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण होतील. त्याच बरोबर मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोकणावर कायमच प्रेम केले असल्याने कायमच झुकते माप देत आहेत. त्यामुळे टीका करण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राजकीय पादत्राणे बाजुला ठेवुन एकत्र यावे.”

News Story Feeds