सातारा : कोरोना (coronavirus) संसर्गापासून संरक्षणासाठी लसीकरण (vaccination) करून घेण्यासाठी अनेक दिवस ताटकळलेल्या तरुणांना (youth) राज्य शासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून, ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी जिल्ह्यातही नियोजन सुरू आहे. लशीच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यामध्ये या वयोगटासाठी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. (satara-vaccination-begins-30-44-age-group-marathi-news)

कोरोना संसर्गाशी मुकाबला करण्यात लसीकरण हा महत्त्‍वाचा टप्पा आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, लसीकरणानंतरही कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित व्यक्तीचा गंभीर अवस्थेत जाण्यापासून बचाव होतो. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सुरवातीला ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर ४५ ते ६० वयोगटातील पूर्वीचे आजार असलेल्या नागरिकांसाठी व त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले.

Also Read: पावसाळ्यातील पर्यटनाचे आगार कोयनानगर

मे महिन्यामध्ये शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठीही लसीकरण सुरू केले. परंतु, लशीची उपलब्धता अत्यंत कमी होती. त्यातच दुसऱ्या डोसची गरज असलेल्यांची संख्या वाढली होती. लसीकरणाचा ताळमेळ बसविण्यासाठी सहा दिवसांतच या वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे तरुणांची निराशा झाली होती. सध्या या वयोगटातील लस घेतलेल्यांचा दुसरा डोसही पूर्ण होत आला आहे. त्यामुळे शासनाने तरुणांना लसीकरण सुरू करण्याचा पुन्हा निर्णय घेतला आहे.

Corona Vaccination

केंद्र सरकारने १८ ते ४४ च्या वयोगटातील नागरिकांना २१ जूनपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, राज्य शासनाने लशींच्या उपलब्धतेचा विचार करून १८ ते ४४ ऐवजी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठीच सध्या लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. कालपासून या लस देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार काल जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेले २०० डोस या वयोगाटतील नागरिकांना देण्यात आले. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यावर या वयोगटाला बंद असलेला लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Also Read: कितीही गुन्‍हे दाखल करा, मी मूग गिळून गप्‍प बसणा-यातली नाही

जिल्ह्यात आज लसीकरण नाही

सोमवार (ता. २१) या वयोगटातील लसीकरण सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार होता. परंतु, जिल्ह्याला अद्याप लशींचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे साेमवारी जिल्ह्यात या वयोगटासाठी लस उपलब्ध होणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाबरोबर ग्रामीण रुग्णालयांमध्ये या वयोगटाच्या लसीकरणासाठी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. लसीकरणाला जाताना नागरिकांना सोबत आधारकार्ड न्यावे लागणार आहे.

काही सुखद बातम्या वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here