नाशिक : आज जागतिक योग दिन. ‘योग‘ हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा असून तो जगातील समस्त मानवजातीसाठी आहे. आपले आरोग्य आरोग्यदायी आणि तणावमुक्त ठेवायचे असेल तर योग हेच खरे औषध आहे. अशाच प्रसंगी आज आपण पाहूयात नाशिकमधील काही मान्यवर योगा करत आहेत, कारण योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ सुयोग्य मार्ग आहे ! हा संदेश ते या मार्फत देत आहेत.

योग म्हणजेच संतुलित मन, सुखी , निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग! विविध योगासनातून सुदृढ आरोग्‍याचा संदेश देतांना नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे..
अभिनेत्री सायली संजीव सांगते… आपले आरोग्य आरोग्यदायी आणि तणावमुक्त ठेवायचे असेल तर योग हेच खरे औषध आहे.
अनुक्रमे नाडी शोधन प्राणायाम व वृक्षासन करतांना ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्‍स प्रा. लि. चे प्रमुख पीयुष सोमाणी.
योगदिनाच्‍या पूर्वसंध्येला निसर्गाच्‍या सानिध्यात योगासन करतांना महाराष्ट्र आयएमएच्‍या सांस्‍कृतिक समितीच्या अध्यक्षा डॉ.प्राजक्‍ता लेले.
योग साधनेत तल्‍लीन झालेल्‍या मेट भुजबळ नॉलेज सिटीच्‍या मार्गदर्शिका डॉ.शेफाली भुजबळ.
विविध योगासनातून सुदृढ आरोग्‍याचा संदेश देतांना वैद्य विक्रांत जाधव.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here