आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांचा ‘पीके’ चित्रपट आठवतो का? आपल्या विश्वात परत जाण्यासाठी जीव तोडून चावी शोधणारा एलियन(पीके) आणि त्याला मदत करणारी जगतजननी यांची ही कथा. विशेष म्हणजे चावी शोधण्याच्या नादात हा एलियन ( पीके) कधी जनतजननीच्या प्रेमात पडतो हे त्याचं त्यालाही समजत नाही. परंतु, हा झाला चित्रपटाचा भाग. पण, प्रत्यक्षात अशी एलियन आणि मानवाच्या प्रेमप्रकरणाची घटना घडल्याचं सामोर आलं आहे. एक ब्रिटीश महिलेने एलियनच्या प्रेमात पडल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या एलियनला ती भेटली असंही तिने सांगितलं आहे. (uk-woman-says-she-fallen-for-alien-after-ufo-abduction-better-than-any-earthling)
गेल्या कित्येक वर्षांपासून वैज्ञानिक, शास्त्रज्ञ एलियनच्या अस्तित्त्वाचा शोध घेत आहेत. काहींच्या मते, एलियन अवकाशातून येतात, तर काहींनी एलियनचं अस्तित्व समुद्राच्या खोल तळाशी असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे अनेकदा अवकाशपातळी एलियनच्या उडत्या तबकड्या दिसल्याचा दावादेखील काही वैज्ञानिकांनी केला आहे.मात्र, प्रत्यक्षात कोणीच एलियनला पाहिलं नाही. असं सारं असतानाच अब्बी बेला या महिलेने थेट एलियनच्या प्रेमात पडल्याचा दावा केला आहे.
Also Read: ‘सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण’
“एलियनने UFO च्या माध्यमातून माझं अपहरण केलं आणि तेथेच आमची पहिल्यांदा भेट झाली. विशेष म्हणजे पृथ्वीवरील पुरुषांच्या तुलनेत एलियन जास्त चांगले आहेत. माझं अपहरण करणारा एलियन एंड्रोमेडा गॅलेक्सी येथून आला होता. आणि, मला पुन्हा त्याला भेटण्याची आस लागली आहे. एलियनने माझं अपहरण करावं अशी माझी इच्छा असल्याचं मी सहज मस्करीमध्ये म्हणाले होते. परंतु, ते प्रत्यक्षात खरं ठरलं. पण त्याला भेटल्यानंतर मला पृथ्वीवरील पुरुषांची किळस येऊ लागली आहे”, असं अब्बा बेला म्हणाली. ‘डेली स्टार’च्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं आहे.
पुढे बेला म्हणते, “रात्री झोपेत असताना मी एक स्वप्न पाहिलं. माझ्या डोळ्यासमोर प्रचंड प्रखर उजेड आला होता आणि एका विशिष्ट जागी माझी वाट पाह असं मला सांगण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बेडरुमची खिडकी ओपन करुन बसले होते. मी झोपायला जाणार तितक्यात एक उडती तबकडी माझ्यासमोर आली. त्यानंतर त्यातून एक हिरवा प्रकाश बाहेर पडला आणि मला UFO मध्ये घेऊन गेला. या UFO मध्ये ५ एलियन असल्याचा दावा बेलाने केला आहे. हे एलियन काही प्रमाणात मानवाप्रमाणेच दिसतात. त्यापैकी एका एलियनने माझ्याशी संवाद साधला आणि माझ्यासोबत चल अशी विनंती केली. परंतु, तो मला कायमच घेऊन जाईल या भीतीने मी नकार दिला. पण, त्यानंतर २० मिनीटांनी मी माझ्या लंडनच्या घरी बेडरुमध्ये होते.”

दरम्यान, बेला आता दररोज रात्री बॅग भरुन तयार असतात आणि तो एलियन पुन्हा येईल आणि त्यांना घेऊन एंड्रोमेडा गॅलेक्सीला निघून जाईल अशी आशा त्यांनी बाळगली आहे. विशेष म्हणजे एलियन आणि मानव यांच्यातील प्रेम केवळ चित्रपटांमध्येच दाखवण्यात आलं आहे. बॉलिवूडमध्ये याच धरतीवर आधारित ‘पीके’ आणि कोरियन ड्रामा ‘My Love From the Star’ हे तुफान लोकप्रिय झाले होते.
Esakal