कोल्हापूर : बदलती जीवनशैली आणि आहारामुळे अनेकांना मधुमेहाने (diabetes) ग्रासले आहे. आयसीएमआरच्या (ICMR research) रिसर्चनुसार भारतामध्ये मधुमेहाचा प्रसार सर्वाधिक होत आहे. ग्रामीण लोकसंख्येमध्ये हा वेग २.४ टक्के, तर शहरी लोकसंख्येमध्ये ११.६ टक्के इतका आहे. ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत शहरामधील मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे. त्याचे सर्वात महत्त्‍वाचे कारण आहार आहे. तो टाळण्यासाठी योग्य आहार (diet) व नियमित व्यायाम (exercise) आवश्‍यक आहे.

मधुमेहामध्ये शरीर इन्सुलिन निर्माण करण्यासाठी किंवा इन्सुलिनचा योग्य उपयोग करण्यास असमर्थ बनते. कौटुंबिक इतिहास, हायपर टेन्शन (उच्च रक्तदाब), (high blood pressure) लठ्ठपणा, धूम्रपान, ताणतणाव, (stress) उदासीन जीवनशैली, कमी हालचाल या गोष्टी मधुमेहासाठी पोषक ठरतात. आरोग्यदायी आहार आणि नियमित शारीरिक व्यायाम हे मधुमेहाच्या व्यवस्थापनात औषधांबरोबर महत्त्‍वाचे ठरते.

काय खाऊ नये –

 • तृणधान्य : मैदा आणि मैद्यापासून बनवलेले सर्व पदार्थ वर्ज्य करावे, दाहरणार्थ केक, बिस्किट, पेस्ट्री इत्यादी

 • भाज्या : बटाटा

 • फळे : आंबा, सीताफळ, केळी, चिकू, फणस इत्यादी

 • दूध व दुग्धजन्य पदार्थ : म्हशीचे दूध, चीज, बटर.

 • मांसाहार : मटण, तळलेले मासे, चिकन इत्यादी

 • अति प्रमाणात तेलकट-तुपकट, खारट पदार्थ वर्ज्य करणे हे अत्यंत लाभदायक ठरेल

काय खावे –

 • तृणधान्य : ज्वारी, नाचणी, ओट्स, बाजरी, ब्राऊन राइस इत्यादी आणि यापासून बनवलेले पदार्थ खाणे.

 • डाळी आणि शेंग : सर्व प्रकारच्या डाळी आणि शेंग शिजवून व्यवस्थित प्रकारे आहारामध्ये समावेश करावा.

 • भाज्या : सर्व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे. तसेच कारली, भोपळा, दोडका, दुधीचा वापर

 • फळे : सफरचंद, पेरू, पपई, स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्रे इत्यादी

 • दूध व दुग्धजन्य पदार्थ : गाईचे दूध, ताक, लो फॅट दही, पनीर इत्यादी

 • मांसाहार : अंड्याचा पांढरा भाग, चिकन, मासे इत्यादी

 • शेंगदाणे : बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता इत्यादी

“काहीही जास्त प्रमाणात खाणे ही अतिशय घातक गोष्ट आहे. मधुमेह रुग्ण सर्व काही खाऊ शकतात, पण ते जर नियमित व्यायाम आणि योग्य आहाराचे पालन करत असतील तरच. “

– प्रज्वला लाड, मधुमेहतज्ज्ञ

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here